तरुण भारत

अम्फान : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून पश्चिम बंगालला 1 हजार कोटींची मदत

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

कोरोना नंतर आलेल्या ‘अम्फान’ चक्री वादळाने पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये मोठ्या प्रमाणात नासधूस केली आहे. त्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालचा दौरा करत नुकसानीची हवाई पाहणी केली. व नुकसान ग्रस्तांसाठी 1 हजार कोटींची मदत जाहीर केली आहे. यावेळी नुकसानीची पाहणी करताना त्यांच्यासोबत बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देखील उपस्थित होत्या.

मोदी म्हणाले, केंद्र व राज्य सरकार अम्फान बाधित लोकांच्या बरोबर आहेत. केंद्र सरकार पश्चिम बंगालला मदत म्हणून 1000 कोटी रुपये देत आहे. तसेच मी पश्चिम बंगालमधील माझ्या बंधू व भगिनींना आश्वासन देतो की या कठीण काळात संपूर्ण देश आपल्या पाठीशी उभा आहे. अ‍ॅम्फॉनमुळे झालेल्या नुकसानीची तसेच बाधित भागाच्या सद्यस्थितीबद्दल सविस्तर सर्वेक्षण करण्यासाठी केंद्र सरकारमार्फत एक पथक पाठविण्यात येणार आहे.

पुढे ते म्हणाले, पुनर्वसन आणि पुनर्रचनांशी संबंधित सर्व बाबींची काळजी घेतली जाईल. त्याच बरोबर पश्चिम बंगालमधील अम्फान चक्रीवादळामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटूंबाला पंतप्रधान मदत निधीतून दोन लाख रुपये आणि गंभीर जखमी झालेल्या प्रत्येकाला 50 हजार रुपये देण्यात येणार आहेत, असे ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

दरम्यान, या ‘अम्फान’ चक्री वादळामुळे पश्चिम बंगालमधील 80 जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी ओडिशाचा ही दौरा करणार आहेत.

Related Stories

लॉकडाऊन वाढणार ?

Patil_p

अवकाश मोहीम : लॉकडाऊनमुळे थांबले चार फायटर पायलटचे प्रशिक्षण

datta jadhav

डिफेन्स एक्स्पोमध्ये 71 सामंजस्य करार

Patil_p

पाकिस्तानात शीखांवर त्याचार, भारताकडून निषेध

Patil_p

5 वर्षीय चिमुरडय़ाचा दिल्ली-बेंगळूर एकटय़ानेच प्रवास

Patil_p

कोल्हापूर जिल्हय़ात सायंकाळपर्यंत 35 कोरोना पॉझिटिव्ह

triratna

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More