तरुण भारत

पाकिस्तान : कराचीजवळ प्रवासी विमान कोसळले

ऑनलाईन टीम / इस्लामाबाद : 

लाहोरहून कराचीला येणारे पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचे प्रवासी विमान लँडिंग करताना आज दुपारी कोसळले. कराचीमधील जिना आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल पाकिस्तान सरकारने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.
 

अपघातग्रस्त विमान पीआयए एअरबस ए ३२० प्रकारातील होते. या विमानात 85 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स असे एकूण 97 जण होते.  हे विमान लाहोरहून कराचीला येत असताना लँडिंगला केवळ एक मिनिट बाकी असताना हे विमान कोसळले. घटनास्थळी आग लागली असून, चार ते पाच घरे जळून खाक झाली आहेत. या भागातील काही गाड्यांचेदेखील नुकसान झाले आहे.

घटनास्थळी पाकिस्तानी रेंजर्स आणि पाकिस्तानी लष्करच्या तात्काळ कृती दलाचे जवान दाखल झाले आहेत. विमानातील प्रवाशांसह मॉडेल टाऊन परिसरातील काही लोकांचा या दुर्घटनेत मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Related Stories

204 देशांमध्ये संसर्ग 54199बळी

Patil_p

दख्खनचा राजा जोतिबाची यात्रा भाविकांविना

triratna

दिलासादायक : पंजाबमध्ये एका दिवसात 508 रुग्ण कोरोनामुक्त

pradnya p

महाराष्ट्रातील 203 विद्यार्थी अडकलेत रशियात

datta jadhav

अमेरिकेत कोरोनाबळींनी ओलांडला एक लाखाचा टप्पा

datta jadhav

डोनाल्ड ट्रम्प सर्व आरोपांमधून मुक्त

Patil_p

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More