तरुण भारत

आरबीआयच्या घोषणांवर बाजाराची नाराजी

सेन्सेक्समध्ये 260.31 अंकांची घसरण : बँकिंग व वित्तीय कंपन्या नुकसानीत

वृत्तसंस्था/ मुंबई

देशातील कोविड19 चा वाढता विळखा कमी होण्याचे प्रमाण विविध उपाययोजना राबवण्यात येऊनही कमी होत नसल्याचे पहावयास मिळत आहे. यामध्ये आर्थिक चक्र काही प्रमाणात सुरु ठेवण्यासाठी नियम व अटींच्या आधारे सरकारने परवानगी दिली आहे. परंतु अर्थव्यवस्थेचा कणा मोडलेला असताना त्याला सावरण्यासाठी रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) रेपोदर कपातीसह अन्य विविध प्रकारच्या घोषणा शुक्रवारी केल्या. परंतु सदरच्या नवीन घोषणांचा शेअर बाजारावर मात्र सकारात्मक परिणाम दिसून आला नाही.

चालू आठवडय़ातील शेवटच्या दिवशी शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 260.31 अंकांनी घसरुन निर्देशांक 30,672.59 वर बंद झाला. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 67.00 अंकांची घसरण नेंदवत निर्देशांक 9,039.25 वर बंद झाला. दिवसभरातील व्यवहारांमध्ये प्रामुख्याने बँकिंग आणि वित्तीय कंपन्यांचे समभाग घसरले आहेत. कारण रेपो दरात कपात केल्यामुळे कर्जावरील व्याजर कमी होणार आहे तर दुसरीकडे कर्जाचे हप्ते भरण्याचा कालावधी आणखीन तीन महिन्यांनी वाढवून ऑगस्टपर्यंत सवलत देण्याची घोषणा केली आहे.

दिवभरातील व्यवहारांमध्ये सेन्सेक्समधील कंपन्यांमध्ये ऍक्सिस बँकेचे समभाग सर्वाधिक पाच टक्क्मयांनी घसरले आहेत. सोबत एचडीएफसी, बजाज फायनान्स, आयसीआयसीआय बँक, टाटा स्टील, बजाज ऑटो, एचडीएफसी बँक आणि इंडसइंड बँक यांचे समभागही घसरणीत राहिले आहेत. दुसऱया बाजूला महिंद्रा ऍण्ड महिंद्राचे समभाग लाभात राहिले आहेत.

दबावाचे वातावरण

चालू आठवडय़ात पहिल्या दिवशीच्या सेन्सेक्समधील घसरणीनंतर अन्य दिवसात शेअर बाजाराने आपला तेजीचा प्रवास कायम ठेवला होता. परंतु आरबीआयने शेवटच्या दिवशी शुक्रवारी अचानकपणे रेपोदर कपातीसह अन्य महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये देशाचा जीडीपी कमी राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच समाधानकारक मान्सून होण्याच्या संकेतामुळे कृषी क्षेत्राकडून अर्थव्यवस्थेला आधार मिळणार असल्याचे म्हटले आहे. परंतु जगाची अर्थव्यवस्थाही संकटाचा सामना करत असून यासह अन्य प्रकारचे मुद्दे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आपल्या पत्रकार परिषदेत मांडल्याने शेअर बाजारातील आर्थिक क्षेत्र बाजारावर नाराज राहिल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.

Related Stories

चेन्नईत हय़ुंडाईचे उत्पादन सुरु

Patil_p

एमआय 10 स्मार्टफोन 8 ‘मे’ला बाजारात

Patil_p

भारतीय सूत जगात सर्वात स्वस्त, निर्यात-

Patil_p

एचसीएलकडून कर्मचाऱयांना दिलासा

Patil_p

वीज मागणी 30 टक्क्यांनी घटली

Patil_p

चालू आर्थिक वर्षात सिमेंटची मागणी घसरणार ?

Patil_p

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More