तरुण भारत

सोलापुरात आज 28 कोरोनाग्रस्तांची भर, 6 जणांचा मृत्यू

एकूण कोरोना बाधित व्यक्तींची संख्या झाली 516

तरुण भारत संवाद प्रतिनिधी/सोलापूर

शहरात शुक्रवारी रात्री आठ वाजेपर्यंत नवीन 28 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. ज्यामध्ये 14 पुरुष व 14 महिलांचा समावेश आहे. तर तब्बल 6 जणांचा मृत्यू झाला असुन एकूण कोरोना बाधित व्यक्तींची संख्या 516 झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

आज, शुक्रवारी 180 अहवाल प्राप्त झाले. यामधे 28 कोरोनाग्रस्तांची भर पडली. यामध्ये नई जिंदगी 1, कुमठा नाका 2, निलम नगर 9, शोभादेवी नगर, नई जिंदगी 1, मिलींद नगर, बुधवार पेठ 1,शिवशरण नगर, MIDC 1, सात रस्ता 1, लोकमान्य नगर 3, पुना नाका 1, मुरारजी पेठ 3, जगदंबा नगर 1, हैद्राबाद रोड, सोलापूर 1, उपरी, (ता. पंढरपूर) 1, मराठा वस्ती, भवानी पेठ 1 आणि कर्णिक नगर 1 अशा 28 रुग्णांचा समावेश आहे.

तसेच उपचारा दरम्यान तब्बल 6 जणांचा मृत्यू झाला. 152 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. अद्याप 159 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. तर शुक्रवारी कोरोनामुक्त झालेल्या 14 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आजतागायत एकूण 40 जणांचा मृत्यू झाला आहे. 252 कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत.

Related Stories

देहरादूनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 93 वर

pradnya p

डॉ. के. के. सिजोरिया यांना जीवनगौरव सुश्रुत पुरस्कार जाहीर

prashant_c

उत्तम नागरिक ही भारताची सर्वात मोठी गरज : डॉ.अ.ल. देशमुख

prashant_c

सोलापुरात आज तब्बल 103 नवे रुग्ण, तिघांचा मृत्यू

Shankar_P

महाविकास आघाडीतील ज्येष्ठ मंत्र्याला कोरोनाची लागण

datta jadhav

निजामुद्दीन येथील त्या अकरा जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह – जिल्हाधिकारी

triratna

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More