तरुण भारत

‘कोरोना’ पोहोचला आता ब्रिटिश न्यायालयात

भारतीय वंशाच्या दांपत्याकडून ब्रिटिश सरकारविरुद्ध अभियोग

वृत्तसंस्था/ लंडन

ब्रिटिश सरकारने पीपीईच्या उपयोगासंदर्भात दिशाभूल करणारे आणि धोकादायक दिशानिर्देश दिल्याचा आरोप करत ब्रिटनमधील एका भारतीय दांपत्याने तेथील सरकार विरोधात न्यायालयात दाद मागितली आहे. अशाप्रकारे आता कोरोनाचा विषाणू ब्रिटिश न्यायालयातही पोहोचला आहे.

डॉ. निशांत जोशी आणि त्यांची गर्भवती पत्नी डॉ. मिनल यांनी हे प्रकरण सादर केले आहे. सरकारने पीपीईच्या उपयोगासंदर्भात चुकीचे दिशानिर्देश दिल्याने गेल्या दोन महिन्यांमध्ये ब्रिटनमध्ये शंभरहून अधिक डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱयांचा मृत्यू ओढवला आहे. या मृत्यूंसाठी केवळ सरकारच जबाबदार आहे. एक महिन्यापूर्वी सरकारला यासंदर्भात नोटीस पाठवूनही काहीही उत्तर न आल्याने प्रशासनाविरोधात न्यायालयात जावे लागत आहे, असे या दांपत्याने म्हटले आहे.

ब्रिटिश सरकारने दिलेल्या दिशानिर्देशानुसार वैद्यकीय कर्मचाऱयांसाठी पीपीईचा वापर अत्यावश्यक करण्यात आला नव्हता. त्याचप्रमाणे एकदा उपयोगात आणलेल्या पीपीईचा पुर्नवापर करण्याची मुभाही देण्यात आली होती. वास्तविक हे दिशानिर्देश जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमांविरुद्ध होते. ही बाब त्याचवेळी प्रशासनाच्या लक्षात आणून देण्यात आली होती.

तथापि, प्रशासन निष्काळजी राहिल्याने अनेक डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱयांना प्राणास मुकावे लागले आहे. त्यामुळे ब्रिटिश सरकारने याचे उत्तरदायित्व स्वीकारावे आणि योग्य दिशानिर्देश लागू करावेत. तसेच नुकसानभरपाईची व्यवस्था करावी, अशी मागणी या दांपत्याने सादर केलेल्या अभियोगामध्ये करण्यात आली आहे. या अभियोगाला ब्रिटनमधून मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे ब्रिटिश सरकारची कोंडी होण्याची शक्मयता आहे. ब्रिटिश सरकार याचा प्रतिवाद कशाप्रकारे करणार, याकडे आता उत्सुकतेने पाहिले जात आहे.

सिंगापूरमध्ये 30 हजार पार

सिंगापूर देशात प्रारंभी कमी असणारी कोरोनाबाधितांची संख्या गेल्या आठवडाभरात बरीच फुगली आहे. आता या देशाने 30 हजारची पातळी पार केली असून यातील बहुतेक रुग्ण विदेशी वंशाचे असल्याचे सांगण्यात आले आहे. शुक्रवारी एकाच दिवसात 614 रुग्ण आढळून आले. ही आतापर्यंतची त्या देशातील एका दिवसातील सर्वात मोठी संख्या आहे. अनेक विदेशी वंशाच्या नागरिकांना स्वतंत्र इमारतींमध्ये विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून प्रशासनाने मोठय़ा प्रमाणावर जनजागृती मोहीम हाती घेतली आहे.

पाकिस्तानात 50 हजारहून अधिक

पाकिस्तानमध्येही कोरोनाबाधितांची संख्या झपाटय़ाने वाढत असून आता हा आकडा 50 हजारहून अधिक झाला आहे. मृत्यू पडलेल्यांची संख्याही अकराशेच्या जवळपास पोहोचली आहे. या देशाच्या पंजाब प्रांतात कोरोनाचा कहर सर्वाधिक असून 60 टक्क्मयांपेक्षा अधिक रुग्ण या एकाच प्रांतातील आहेत. त्याखालोखाल सिंध प्रांतामध्ये सर्वाधिक बाधित आहेत. पाकिस्तानने गेल्या आठवडय़ात लॉकडाऊन शिथिल करण्याचा आदेश दिल्यानंतर रुग्णसंख्या वाढत आहे. शुक्रवारी एकाच दिवसात 2603 नवे रुग्ण आढळले आहेत. 

नेपाळमध्ये बाधितांच्या संख्येत वाढ

कोरोनाच्या जागतिक उद्रेकापासून बऱयाच प्रमाणात आतापर्यंत सुरक्षि राहिलेल्या नेपाळमध्ये आता रूग्णसंख्या वाढू लागली आहे. शुक्रवारी दिवसभरात 50 नव्या रूग्णांची भर पडल्याने येथे अर्धशकत ओलांडले गेले. या देशात आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. तसेच आतापर्यंत 21 रूग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. नेपाळनेही भारताप्रमाणेच 24 मार्चला लॉकडाऊन घोषित केला होता. तो 2 जूनपर्यंत कायम राहणार आहे. नेपाळमध्ये आतापर्यंत 42 हजारांहून अधिक चाचण्या झाल्या आहेत.

मल्याळी चित्रपट कलाकार परतले

जॉर्डन या मध्यपूर्वेतील देशात अडकलेले 58 मल्याळी चित्रपट कलाकार शुक्रवारी भारतात परतले आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. मार्चच्या शेवटच्या आठवडय़ात भारतात लॉकडाऊन घोषित करण्यापूर्वी ते चित्रपट निर्मितीसाठी जॉर्डनला गेले होते. मात्र, लॉकडाऊनमुळे त्यांना भारतात परतणे अशक्मय झाले. परिणामी जवळपास दोन महिने त्यांना तेथेच अडकून पडावे लागले. त्यांच्यामध्ये पृथ्वीराज नामक प्रसिद्ध मल्याळी अभिनेत्याचाही समावेश आहे. शुक्रवारी एअर इंडियाच्या विशेष विमानाने हा संपूर्ण कलाकार संच पोहोचला.

 इटलीमध्ये उदेकात घट

गेल्या महिन्यापर्यंत कोरोनाचे जगात सर्वाधिक बाधित असलेल्या इटलीमध्ये आता परिस्थिती हळूहळू नियंत्रणात येत आहे. प्रतिदिन नव्या रुग्णांची संख्या घटत असून मृत्यूंची दैनंदिन संख्याही सरासरी 50 च्या खाली पोहोचली आहे. इटली प्रशासनाने देशातील लॉकडाऊन आणखी शिथिल करण्याचा निर्णय घेतला असून बार आणि रेस्टॉरंटना अनुमती दिली आहे. मात्र, एका वेळी तेथे उपस्थित असणाऱया ग्राहकांच्या संख्येवर बंधने घालण्यात आली आहेत. विदेशी प्रवाशांच्या आगमनावरील बंदी मात्र अद्यापही कायम आहे.  यामुळे जवळपास दोन महिने निर्मनुष्य असणारे या देशातील रस्ते आता काही प्रमाणात गजबजू लागले आहेत. कोरोनामुळे इटलीच्या अर्थव्यवस्थेला 50 हजार कोटी डॉलर्सचा फटका बसेल, असे अनुमान तेथील सरकारने व्यक्त केले आहे.

चीनला सोडणार नाही

अमेरिकेत आणि जगभरात कोरोनाचा प्रसार केवळ चीनमुळे झाला असून अमेरिका आता स्वस्थ बसणार नाही, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. अमेरिकेत कोरोनामुळे मृत झालेल्यांची संख्या 90 हजारांपेक्षा अधिक झाली असून चीनने वेळीच जगाला सावध केले असते तर अशी गंभीर परिस्थिती ओढवली नसती, या आरोपाचा त्यांनी पुनरुच्चार केला. चीनवर कोणत्या प्रकारे कारवाई करावयाची? याबद्दल लवकरच निर्णय घेण्यात येईल. कोरोना विषाणूचे जन्मस्थान चीनच असल्याची अमेरिकेची खात्री पटली आहे. परिणामी चीनला जबाबदारी स्वीकारावी लागेल असा इशारा अमेरिकेने दिला आहे. 

Related Stories

स्पेनमध्ये निदर्शने

Patil_p

‘धन्यवाद प्रिय मित्रा!’ इस्त्राईलच्या पंतप्रधानांनी मानले मोदींचे आभार

prashant_c

ब्लादिमीर पुतीन यांचे रशियात नवे डावपेच

Patil_p

भारत-नेपाळ सीमावाद संपणार?

Patil_p

चीनमधील दोन शहरांची नाकेबंदी, अवागमन बंद

Patil_p

इस्लाम स्वीकारण्यास हिंदू मुलीचा नकार

Patil_p

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More