तरुण भारत

रुग्णसंख्या वाढतीच : 138 नवे संसर्गबाधित

राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1743 : परप्रांतातून आलेल्यांमुळे धोका वाढला

प्रतिनिधी/ बेंगळूर

लॉकडाऊन शिथिल झाल्यापासून परराज्यातून स्थलांतरित कामगार परतत असून त्यांच्यापैकी अनेक जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. आठवडाभरापासून 80 टक्क्यांपेक्षा अधिक रुग्ण हे परप्रांतातून आलेले आहेत. शुक्रवारी देखील 138 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्णसंख्या 1743 वर पोहोचली आहे.

महाराष्ट्रातून अधिक संख्येने परतलेल्या आणि सध्या क्वारंटाईनमध्ये असणाऱया अनेक जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह येत आहेत. त्यामुळे राज्यातील जनतेतील भीती आणखी वाढली आहे. मंडय़ा, हासन, उडुपीनंतर आता चिक्कबळ्ळापूरमध्ये मुंबईवरून आलेल्या अनेक जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. शुक्रवारी या जिल्हय़ात 47 जण बाधित आढळून आले आहेत. तसेच हासनमध्ये 14, रायचूरमध्ये 10, बिदरमध्ये 9, तुमकूर व मंडय़ामध्ये प्रत्येकी 8, चिक्कमंगळूर, बेंगळूर शहर व बेंगळूर ग्रामीण जिल्हय़ात प्रत्येकी 5, उडुपी, दावणगेरे आणि हावेरी प्रत्येकी 3, धारवाड, यादगिर व शिमोगा जिल्हय़ात प्रत्येकी 2 तसेच बेळगाव, बागलकोट, मंगळूर, कारवार, चित्रदुर्गमध्ये प्रत्येकी 1 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे.

शुक्रवारी पॉझिटिव्ह आढळलेल्या 138 पैकी 116 रुग्ण परराज्यातून आलेले आहेत. तर 26 जण संसर्गमुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 597 जण संसर्गमुक्त झाले आहेत. तर 1104 जणांवर विविध इस्पितळांमध्ये उपचार सुरू आहेत. त्यापैकी 19 जण व्हेंटिलेटरवर आहेत. 41 जणांना कोरोनामुळे मृत्यू झाला असून एकाने आत्महत्या केली आहे.

मंडय़ा जिल्हयात पोलिसाला कोरोना

मंडय़ा जिल्हय़ातील के. आर. पेठ येथील पोलीस स्थानकात सेवा बजावणाऱया पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे के. आर. पेठ शहर आणि ग्रामीण ाsलीस स्थानक पूर्णपणे सीलडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे येथील कामकाज किक्केरी पोलीस स्थानकातून चालणार आहे.

क्वारंटाईन होताच व्यक्तीची आत्महत्या :अहवाल पॉझिटिव्ह

मुंबईहून आलेल्या 55 वर्षीय व्यक्तीने क्वारंटाईन झालेल्या दोन तासात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी मंगळूर जिल्हय़ाच्या मुडबिदी येथील शाळेत घडली आहे. सदर व्यक्ती कडंदले येथील रहिवासी आहे. तो आपल्या दोन भावांसह मुंबईतील हॉटेलमध्ये काम करत होता. गुरुवारी पहाटे त्यांना मुडबिद्री येथे क्वारंटाईन करण्यात आले होते. गावी परतल्यानंतर उदरनिर्वाहासाठी कोणते काम करायचे?, ही चिंता सतावत असल्याने त्यांने त्याच दिवशी आत्महत्या केली. त्याच्या स्वॅबचा अहवाल शुक्रवारी कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.

कोरोनामुळे पतीचा मृत्यू झालेल्या दिवशी पत्नी प्रसूत

मंगळूर जिल्हय़ातील मुडबिद्री येथील व्यक्तीचा मुंबईत ज्या दिवशी कोरोनामुळे मृत्यू झाला त्याच दिवशी त्याची पत्नी मंगळूरमध्ये प्रसूत झाली. मुंबईला गेलेली व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्यामुळे त्याला तेथील इस्पितळात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचाराचा उपयोग न झाल्याने गुरुवारी त्याचा मृत्यू झाला. त्याच्या पत्नीने इकडे मुडबिद्रीत मुलाला जन्म दिला. दुर्दैवाने तिला मृत पतीचे अंतिम दर्शन घेणेही शक्य झालेले नाही.

Related Stories

लवकरच येणार भारतीय ‘व्हॉट्सऍप’ रविशंकर प्रसाद यांनी केली घोषणा

Patil_p

दुसरे आर्थिक पॅकेज देण्याची तयारी

Patil_p

अमानुतल्ला खान विरोधात एफआयआर

Patil_p

सौदी अरेबिया शस्त्रास्त्रांचा मोठा आयातदार

tarunbharat

भारत-चीन सैनिकांमध्ये झटापट, भारताचे 4, चीनचे 7 जवान किरकोळ जखमी

datta jadhav

श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ला

Patil_p

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More