तरुण भारत

मोदी सरकारकडून गरीबांची फसवणूक

विरोधी पक्षांच्या बैठकीत सोनिया गांधीची टीका, सप आणि बसप अनुपस्थित 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

कोरोना उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर काँगेसने शुक्रवारी आयोजित केलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे. मोदी सरकारचे 20 लाख कोटीरूपयांचे पॅकेज हा केवळ गरीबांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे. या पॅकेजमध्ये त्यांच्यासाठी काहीही नसल्याने त्यांची फसवणूक झाली आहे, अशी प्रखर टिप्पणी काँगेसच्या अस्थायी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली. या बैठकीला 20 विरोधी पक्षांचे प्रतिनिधी उपस्थिती राहिले.

कोरोना संकटाशी सामना प्रामुख्याने गरीबांना करावा लागत आहे. कोटय़वधी स्थलांतरीत कामगारांना सरकारने वाऱयावर सोडले असून त्यांच्यासाठी कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही. लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. सरकार लॉकडाऊनच्या परिणामांसंबंधी अज्ञानात होते असे दिसून येत आहे. तसेच लॉकडाऊन उठविताना कोणतेही योग्य दिशानिर्देश देण्यात आले नाहीत. त्यामुळे राज्य  सरकारांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे असे अनेक आरोप सोनिया गांधी यांनी केले.

लॉकडाऊनची उद्देष्टय़े अपूर्ण

21 दिवसात कोरोना पूर्णतः संपवू असे सरकारला पहिल्या लॉकडाऊनच्या वेळी वाटत होते. तथापि, सरकारचे हे उद्दिष्टय़ पूर्ण झाले नाही. कोरोना आता बराच काळ आपल्यासोबत राहील असे दिसून येत आहे. सरकारने मोठय़ा आर्थिक पॅकेजची घोषणा बऱयाच आधी करावयास हवी होती. तशी सूचना सरकारला अनेक अर्थतज्ञांनी अनेकदा केली होती. तथापि, त्याकडे सरकारने दुर्लक्ष केले. परिणामी, लोकांचे मोठय़ा प्रमाणात हाल होत आहेत. स्थलांतरीत कामगारांच्या परतीच्या प्रवासाची व्यवस्था सरकारने लवकर करावयास हवी होती, असेही प्रतिपादन सोनिया गांधी यांनी केले.

स्थलांतराचा प्रश्न गंभीर

सध्या लक्षावधी कामगार, आपली मुले व कुटुंबांसह पायी चालत आपल्या गावी निघाली आहेत. हे अंतर शेकडो किलोमीटरचे आहे. हे लोक जवळ पैसा नसताना उपाशी पोटी हा प्रवास करीत आहेत. मात्र केंद्र सरकारला त्यांची कोणतीही दया येत नाही. हे सरकार संवेदनाहीन आहे, अशीही टीका त्यांनी केली.

गरीबांविरोधात कौर्य

कोरोनाचा फटका केवळ स्थलांतरित कामगारांनाच बसलेला नाही. त्याशिवाय देशातील 13 कोटी गरीब कुटुंबे आज निराधार आहेत. त्यांचे रोजगार गेले आहेत सरकारने त्यांना त्यांच्या नशीबावर सोडून दिले आहे. सरकार त्यांच्याशी कौर्याने वागत असून हे सहन पेले जाणार नाही. सरकारने या गरीबांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले.

चाचण्यांतही गोंधळ

जलद आणि व्यापक चाचण्या करण्याच्या धोरणातही सरकारचा गोंधळ उडालेला आहे. चाचण्यांची सामग्री आयात करतानाही बऱयाच चुका झाल्या. त्यामुळे चाचण्यांचे प्रमाण कमी राहिले आहे. याचा परिणाम म्हणून कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, असा दावा त्यांनी केला.

महत्वाचे पक्ष अनुपस्थित

या बैठकीला द्रमुक, डावे पक्ष, झारखंड मुक्ती मोर्चा, राष्ट्रवादी काँगेस, नॅशनल कॉन्फरन्स, तृणमूल काँगेस आदी 20 पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. ,मात्र समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष हे दोन महत्वाचे पक्ष अनुपस्थित होते. आम आदमी पक्षनेही दूर राहणे पसंत केले. मात्र आम आदमी पक्षाला निमंत्रणच दिले नव्हते, असे स्पष्टीकरण नंतर काँगेसने दिले. महत्वाचे पक्ष अनुपस्थित राहिल्याने विरोधी ऐक्य घडविण्याच्या प्रयत्नांना खीळ बसली आहे, असा आरोप नंतर काही राजकीय तज्ञांनी केला.

Related Stories

कोरोना लढाईसाठी मोदींकडून भाजपच्या कार्यकर्त्यांना पाच सूचना

prashant_c

देशभरात आणखी 796 जण बाधित

Patil_p

देशात गेल्या 24 तासात कोरोनाच्या 1 हजार 543 रुग्णांची भर

pradnya p

के. व्ही. कामत यांना केंद्रात मंत्रिपद?

Patil_p

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

pradnya p

4 मुलींवर सामूहिक बलात्कार

Patil_p

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More