तरुण भारत

केंद्राकडून प. बंगालला एक हजार कोटीची मदत

‘अम्फान’ प्रभावित परिसराची

वृत्तसंस्था/ कोलकाता

अम्फान चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या पश्चिम बंगाल आणि ओडिशा राज्याला केंद्र सरकारने शुक्रवारी अनुक्रमे 1 हजार आणि 500 कोटी रूपयांची मदत जाहीर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही राज्यांमधील नुकसान झालेल्या परिसराची पाहणी केली. चक्रीवादळात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना पंतप्रधान मदत निधीतून दोन लाख रूपयांच्या मदतीची घोषणा त्यांनी केली. दरम्यान, एक हजार कोटी देण्याची घोषणा केली. मात्र हेच पॅकेज आहे की सुरूवातीची रक्कम याचा खुलासा केलेला नाही, असा टोला लगावत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्राच्या आर्थिक मदतीवर साशंकता व्यक्त केली आहे.

पंतप्रधानांनी नुकसानग्रस्त भागाच्या पाहणी करावी, असे आवाहन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरूवारी केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी
नुकसानग्रस्त परिसराचा दौरा केला. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले, अम्फान चक्रीवादळामुळे कमीतकमी नुकसान व्हावे, यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने प्रयत्न केले; पण यानंतरही 80 नागरिकांना आम्ही वाचवू शकलो नाही. याचे आम्हाला दु:ख आहे. पश्चिम बंगालमध्ये कृषी, ऊर्जा आणि व्यापाराचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेकडो लोकांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत. त्यांना मदत करणे हे आमचे कर्तव्य आहे. यासाठी सरकार सर्व पातळीवर प्रयत्न करेल, अशी ग्वाहीही पंतप्रधान मोदी यांनी दिली. लवकरच केंद्र सरकारचे पथक नुकसानग्रस्त भागाची पाहणी करेल. या पथकाच्या अहवालानंतर पुनर्वसन आणि पुनर्निमाण कार्याबाबत निर्णय होईल, असेही त्यांनी सांगितले.

पश्चिम बंगालमधील मृतांचा आकडा 80 वर

राज्यात चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. अम्फान चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालमधील मृतांचा आकडा 80 झाला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिली. कोलकाता, हावडा, हुगलीसह सात जिल्हय़ांना चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसला आहे. सध्या राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे 41 पथकांसह भारतीय सैन्यदल, नौदल आणि हवाई दलही मदत कार्यात कार्यरत आहे.

ओडिशाला 500 कोटींची मदत जाहीर

ओडिशामधील चक्रीवादळाचा फटका बसलेल्या जिल्हय़ांचीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहणी केली. यानंतर राज्याला 500 कोटींची मदत जाहीर केली. केंद्र सरकारच्या पथकाच्या पाहणीनंतर पुढील मदत दिली जाईल, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले.

Related Stories

कोल्हापूर, इचलकरंजीतील दोघे पॉझिटिव्ह

Shankar_P

छत्तीसगडमध्ये मदतनिधीची घोषणा

Patil_p

आता गावांनीही स्वावलंबी व्हावे!

Patil_p

मच्छीमारांच्या कर्जमाफीची रक्कम अर्थखात्याकडून मंजूर

Patil_p

लॉक डाऊनमध्ये ई-कॉमर्स कंपन्यांना केवळ आवश्यक वस्तूंची विक्री करण्याचे सरकारचे आदेश

prashant_c

नवे धोरण, रिकव्हरी रेट वाढला

Patil_p

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More