तरुण भारत

…तर देशातील रूग्णसंख्या 36ते 70 लाखांवर गेली असती

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

देशात योग्यवेळी लॉकडाऊन जारी केले नसते तर आज देशातील कोरोना विषाणू संसर्गाने हाहाकार माजवला असता. कोरोनाबाधितांची संख्या 36 ते 70 लाख रूग्णसंख्या झाली असती. 37 ते 78 हजार जणांचा मृत्यू झाला असता, लॉकडाऊनमुळेच परिस्थिती नियंत्रणात राहिली, असे विविध संस्थांनी केलेल्या अभ्यासात स्पष्ट झाले आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या परिषदेत नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी शुक्रवारी दिली. दरम्यान, मागील 24 तासांमध्ये देशातील 3 हजार 234 रूग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत देशात 48 हजार 534 जण बरे झाले असून रूग्ण बरे होण्याचा टक्का 41 वर पोहचला आहे, असे आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले.

    कोरोना विषाणू प्रसाराचा अन्य देशांसारखाच भारताला फटका बसला असता; पणलॉकडाऊनमुळे हजारो नागरिकांचे प्राण वाचविणे शक्य झाले. 3 एप्रिलनंतर देशात रूग्णसंख्या कमी झाली. भारताने लॉकडाऊनचा निर्णय घेतला नसता तर देशात 36 ते 70 लाख रूग्णसंख्या झाली असती. सुमारे 1.2 ते 2.1 लाख नागरिकांचा मृत्यू झाला असता, असे बॉस्टन कन्सल्टिंग ग्रुप मॉडलने केलेल्या सर्वेक्षणात म्हटले आहे. देशात रूग्णसंख्या 23 लाखांनी कमी आहेत. 68 हजार जणांचे प्राण वाचल्याचे दोन अर्थशास्त्रज्ञांनी आपल्या अभ्यासात स्पष्ट केले आहे.  सार्वजनिक स्वास्थ्य फौऊडेशच्या माहितीनुसार सुमारे 78 लोकांचा कोरानापासून बचाव झाला आहे, असेही पॉल यांनी सागितले. 

 देशातील मागील 24 तासांमध्ये एक लाख 3 हजार 829 चाचण्या घेण्यात आल्या. सलग चौथ्या दिवशी एक लाखांपेक्षा अधिक चाचण्या घेण्यात आल्या आहेत, अशी माहिती आयसीएमआरचे डॉ. आर. गंगाखेडकर यांनी दिली.

  90 टक्के रूग्ण दहा राज्यांमध्ये

 देशातील 70 टक्के रूग्ण हे शहरी भागातील आहेत. एकुण रूग्णांपैकी पाच राज्यात 80 टक्के आणि पाच शहरांमध्ये 60 टक्के रूग्ण आहेत. 90 टक्के  कोरोनाबाधित 10 राज्यांमध्येच आहे, असे आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी स्पष्ट केले. देशातील कोरोनामुळे मृत्यू होण्याचा टक्का 3.13 वरून 3.01 वर आला आहे. आता केंद्र सरकारचे लक्ष्य हे प्रतिबंधित क्षेत्रातील कडक निर्बंधावर असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

Related Stories

वुहानचे नागरिक मायदेशातच ‘अस्पृश्य’

Patil_p

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या रंगपंचमीच्या शुभेच्छा!

tarunbharat

राज्यात कोरोना रुग्णसंख्या 600 पार

Patil_p

कोरोना संकटात आरबीआयचे ५० हजार कोटीचे पॅकेज

prashant_c

सरकार कडून ‘आरोग्य सेतू’ ॲप लॉन्च

prashant_c

देशभरात आणखी 796 जण बाधित

Patil_p

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More