तरुण भारत

झारखंडहून परतलेल्या वृद्धाला कोरोना

बाधितांची संख्या 120 वर, आणखी 314 जणांच्या अहवालाची प्रतीक्षा

प्रतिनिधी/ बेळगाव

गुरुवारी मुंबई, कोल्हापूर, झारखंडहून बेळगाव जिल्हय़ात आलेल्या 9 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. शुक्रवारी दुसऱया दिवशीही झारखंडमधील शिखरजीहून बेळगावला परतलेल्या एका वृद्धाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हय़ातील एकूण बाधितांची संख्या 120 वर पोहोचली आहे.

राज्य आरोग्य विभागाने शुक्रवारी दुपारी जारी केलेल्या हेल्थबुलेटिनमध्ये राज्यातील 105 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याचा उल्लेख होता. यामध्ये बेळगाव जिल्हय़ातील रुग्ण क्रमांक 1687 या 75 वषीय वृद्धाचा समावेश आहे. शिखरजीहून परतलेल्या दोन महिलांसह तिघा जणांचे अहवाल गुरुवारी पॉझिटिव्ह आले होते.

कागवाड तालुक्मयातील या वृद्धाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मुंबई, अजमेरहून परतलेल्या व त्यांच्या संपर्कातील आणखी 314 जणांचे अहवाल यायचे आहेत. जिल्हा प्रशासनाला या अहवालांची प्रतीक्षा आहे. जिल्हा सर्वेक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्हय़ातील एकूण 9082 जणांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यात आले आहे.

1549 जणांना 14 दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. तर 4 हजार 833 जणांनी 14 दिवसांचे, 2 हजार 643 जणांनी 28 दिवसांचे क्वारंटाईन पूर्ण केले आहे. जिल्हय़ातील 7 हजार 786 जणांची स्वॅबतपासणी करण्यात आली आहे. यापैकी 7 हजार 217 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 120 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

आतापर्यंत 70 जण कोरोनामुक्त

आतापर्यंत 70 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सिव्हिल हॉस्पिटलमधून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. 57 जणांवर उपचार करण्यात येत असून 314 जणांचे अहवाल यायचे आहेत. एक दोन दिवसांत हे अहवाल उपलब्ध होणार आहे. परराज्यातून बेळगावला येणारे प्रवासी, कामगार आदींमुळे कोरोनाचा धोका वाढत चालला आहे.

ई-पासवर आले नियंत्रण

लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर सेवासिंधू ऍपच्या माध्यमातून ई-पास मिळवून कर्नाटकात आलेल्यांपैकी 500 हून अधिक जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे सेवासिंधू ऍपच्या माध्यमातून कर्नाटकात येण्यासाठी अर्ज करणाऱया हजारो नागरिकांना परराज्यातून कर्नाटकात प्रवेश करण्यासाठी सध्या पास नाकारण्यात येत आहे. परिस्थिती सुधारल्यानंतर पुन्हा पासची सुविधा सुरू होणार असून तोपर्यंत ई-पासवर नियंत्रण असणार आहे, अशी माहिती आरोग्य विभागाच्या वरि÷ अधिकाऱयांनी दिली.

रुग्णांची माहिती देण्याची सूचना

कोरोना थोपविण्यासाठी खासगी इस्पितळांनी थंड, ताप, श्वसनाचा त्रास असणाऱया रुग्णांबद्दल माहिती देण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकाऱयांनी केले आहे. kpame.karanataka.tech या वेब पेजसंबंधी युजर आयडी व पासवर्ड मिळत नाही, अशी विचारणा केली जात आहे. खासगी इस्पितळांनी आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याच्या कार्यालयातून ही माहिती मिळवावी व थंड, ताप, श्वसनाच्या त्रासावर उपचारासाठी येणाऱयांची वेबपेजवर माहिती देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

Related Stories

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घुमला वंदे मातरम्चा नारा

Patil_p

खानापूरात लॉकडाऊनचे नियम अधिक कडक

Patil_p

राजहंसगड येथील किराणा दुकानदार अपघातात ठार

Patil_p

स्मार्टफोनचा अतिवापर मुलांसाठी धोकादायक

Patil_p

मजगाव येथे डेंग्यूचा दुसरा बळी

Rohan_P

एनसीसी छात्रांना सरकारी नोकरीमध्ये आरक्षण द्या

Patil_p

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More