तरुण भारत

काम नसल्याने कारखाने बंद करण्याची वेळ

प्रतिनिधी/ बेळगाव

कोरानाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशभर लॉकडाऊन करण्यात आले आणि त्याचा परिणाम सर्वच क्षेत्रांवर दिसू लागला आहे. बेळगावचा आर्थिक कणा मानल्या जाणाऱया उद्यमबाग येथील कारखान्यांनाही याची मोठी झळ बसली आहे. लॉकडाऊननंतर कामच नसल्याने अनेक कारखाने बंद करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे लघुउद्योजक व कामगार रस्त्यावर येऊ लागले आहेत.

भारतात व विदेशातील काही देशांमध्ये फिरणाऱया मोठय़ा वाहनांच्या इंजिनमध्ये बेळगावमध्ये प्रोसेसिंग झालेले क्रॅंक वापरले जातात, असे येथील कामगार छाती ठोकपणे सांगत असतं. या लघुउद्योगावर 10 ते 12 हजार कामगार काम करतात. त्यामध्ये 90 टक्के हे स्थानिक आहेत.

वाहतुकीमुळे जाणवतोय परिणाम

पुण्यातील मोठय़ा ऑटोमोबाईल कंपन्यांमधून बेळगावमध्ये क्रॅंकची ऑर्डर दिली जाते. परंतु सध्या पुण्यामध्ये कोरोनाच्या हाहाकाराने अनेक कंपन्या बंद आहेत. तसेच वाहतूकही बंद असल्याने बेळगावमध्ये काम कसे चालणार? असा प्रश्न कारखाना मालकांसमोर आहे. त्यामुळे कामगारांना सुटय़ा देण्यात आल्या आहेत.

भाजी-फळे विक्री करण्याची आली वेळ

बेरोजगार झालेल्या कामगारांचा रोजीरोटीचा प्रश्न आहे. काम नसल्याने बरेच कामगार सध्या भाजी-फळे विक्री करू लागले आहेत. तरी बऱयाच जणांनी शेती करण्यास सुरुवात केली आहे. हातात कौशल्य असूनही काम मिळत नसल्याने या कामगारांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे.

पुण्याहून वाहतूक सुरळीत होणे गरजेचे

गजानन पोटे (कारखाना चालक)

लॉकडाऊनमुळे मार्च व एप्रिल महिन्यात काम पूर्णपणे बंद होते. मे महिन्यात कारखाने सुरू झाले पण काम नसल्याने कामगारांना सुटय़ा द्याव्या लागल्या आहेत. जोवर पुण्याहून वाहतूक सुरळीत होणार नाही, तोवर ही परिस्थिती राहणार आहे. सरकारने लघुउद्योजकांकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे पोटे यांनी सांगितले.

Related Stories

निपाणीत प्लास्टिक बंदीची धडक कारवाई

Patil_p

चित्रकार मारुती पाटील यांच्या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन

Patil_p

या महिन्यात विजेचे बील मिळणार एसएमएसद्वारे

Patil_p

रात्रंदिवस सेवा बजावणाऱया पोलिसांना अल्पोपहार

tarunbharat

यश साधण्यासाठी आव्हानांना तोंड देणे आवश्यक

Patil_p

अपहरण करुन अल्पवयीन मुलीचे लैंगिक छळ

Rohan_P

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More