तरुण भारत

25 पासून बेळगावमधून झेपावणार विमान

विमान कंपन्यांकडून बुकिंगला प्रारंभ, बेंगळूर, अहमदाबाद, हैद्राबाद बुकिंग सूरू

प्रतिनिधी/ बेळगाव

केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाकडून हिरवा कंदिल मिळताच देशांतर्गत विमान वाहतूकीला 25 मे पासून प्रारंभ होत आहे. बेळगावमधूनही देशातील महत्त्वाच्या शहरांना सोमवारपासून विमान झेपावणार आहे. विमान कंपन्यांनी बेळगावमधून सेवा देण्यास सहमती दर्शविली असून काही कंपन्यांनी ऑनलाईन बुकिंगही सुरू केले आहे.

ऑलडाऊन जाहीर करताच बेळगावच्या सांबरा विमानतळावरून होणारी सर्व विमानांची वाहतूक ठप्प झाली. दररोज हजार प्रवासी या विमानतळावरून प्रवास करीत असतात. मुंबई, बेंगळूर, पुणे, तिरूपती, कडप्पा, हैद्राबाद, अहमदाबाद, जयपूर, इंदूर या शहरांना बेळगावच्या सांबरा विमानतळावरून सेवा देण्यात येते. स्पाईस जेट, अलायन्स एअर, स्टार एअर, इंडिगो, ट्रुजेट या कंपन्या बेळगावमधून सेवा देतात.

केंद्रीय विमान प्राधिकरणाकडून आदेश येताच सेवा सुरू करण्यात येणार असे सांगण्यात आले होते. तशी तयारीही सुरू करण्यात आली होती. सेवा सुरू करण्याबाबत आदेश मिळताच व विमान कंपन्यांनी उड्डाणाला सहमती दर्शविल्याने आता मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे पुन्हा एकदा तब्बल दोन महिन्यांनंतर विमानसेवा पूर्ववत होणार आहे.

या शहरांसाठी ऑनलाईन बुकिंग सुरू

बेंगळूर-बेळगाव-बेंगळूर व अहमदाबाद-बेळगाव-अहमदाबाद या सेवेसाठी स्टार एअरने बुकिंग सुरू केले आहे. मुंबई-बेळगाव-मुंबई व हैद्राबाद-बेळगाव-हैद्राबाद यासाठी स्पाईसजेट कंपनीने बुकिंग सुरू केले आहे. इतर विमान कंपन्याही सज्ज झाल्या असून लवकरच इतर शहरांनाही सेवा सुरू होणार आहे.

Related Stories

संकेश्वरमध्ये निर्बंध अंशत: शिथिल

Patil_p

बेळगावच्या सुपुत्राची कॅप्टनपदी निवड

Patil_p

काकती पोलिसांनी केला गावठी दारूसाठा नष्ट

Rohan_P

हैदराबादच्या हवाई प्रवाशांमध्ये कमालीची वाढ

Patil_p

प्रत्येकामध्ये लेखनाची उर्मी असणे आवश्यक

Patil_p

लॉकडाऊन संपल्यानंतरच दहावीचे वेळापत्रक होणार जाहीर

Patil_p

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More