तरुण भारत

राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांचे संबंध मधुर, पिता-पुत्रा प्रमाणेच – खा. संजय राऊत

खा. संजय राऊत यांनी राज्यपालांची घेतली भेट

मुंबई – प्रतिनिधी

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. राज्यपाल आणि सरकार यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची होती. “राज्यपाल हे आमचे मार्गदर्शक आहेत, खूप दिवस व्यक्तीशा भेटलो नव्हतो, बऱ्याच दिवसापासून भेट राहिली होती, त्यामुळे सदिच्छा भेट घेतली, असं संजय राऊत यांनी या भेटीनंतर सांगितलं.

राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांचे संबंध मधुर आहेत, एखाद्या पिता-पुत्राचे त्यांचे संबंध आहेत, तसेच राहावेत, दऱ्या वगैरे आमच्यात काही पडत नाहीत, असंही यावेळी संजय राऊत यांनी सांगितलं. उदय सामंत यांनी मत व्यक्त केलं, राज्यपाल हे कुलपती आहेत, त्यांनी त्यांचं मत सांगितलं, त्याबाबत सरकार-संबंधित मंत्री निर्णय घेतील. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे-माझे जुने संबंध, राज्यपालांना सरकार काय करतंय याची माहिती आहे.

विरोधी पक्षांना आंदोलनाचा अधिकार आहे, मात्र सध्या देश, महाराष्ट्रात जे संकट आहे, अशावेळी विरोधकांनी सरकारसोबत उभं राहायला हवं, त्यांनी मुख्यमंत्र्यांशी जाऊन थेट बातचीत करायला हवी, असेही राऊत म्हणाले.

Related Stories

हत्येसारखा गंभीर गुन्हा करणाऱ्या आरोपींना जामीन, पॅरोलवर सोडले जाणार आहे

Rohan_P

आमदार मकरंद पाटील यांनी कोरोना बाधित गावांना दिला धीर

triratna

रत्नागिरी-सिंधुदुर्गातील मच्छीमारांना डिझेल परतावा मिळणार- उदय सामंत

Patil_p

वर्दीतली माणुसकी

omkar B

रत्नागिरीत एका दिवसात 4 रुग्ण वाढले, कोरोना बाधितांची संख्या 15 वर

triratna

उस्मानाबाद जिल्हयात दोन दिवसात सापडले ८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

triratna

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More