Tarun Bharat

तैवानवरुन तणावाने भारतीय कंपन्या काळजीत?

Advertisements

मोबाईल, टीव्हीसह लॅपटॉप निर्मिती करणाऱया कंपन्यांचा समावेश

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

तैवानवर चीन आणि अमेरिका यांच्यामध्ये तणावाची स्थिती वाढत जात असल्याने भारतीय कंपन्यांची धाकधूक वाढवली आहे. या कारणास्तव आता  काही इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची निर्मितीशी संबंधीत असणाऱया घटकांमध्ये दबाव वाढत जाणार असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.

कारण हा सर्व खेळ हा चिप उत्पादनांशी संबंधीत राहणार आहे. कोरोना संकटाच्या दरम्यान रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाच्या कारणास्तव अगोदरपासूनच सेमिकंडक्टरची कमतरता निर्माण झाली आहे. ही समस्या जवळपास दोन वर्षांपासून सुरु असल्याचे दिसून येत आहे. यात आता भर म्हणून अमेरिका आणि चीन यांच्यात तैवानच्या मुद्यावरुन आमने सामने आल्याचे पहावयास मिळते, या स्थितीमुळे चिंता आणखीन वाढली आहे. कारण जगात चिप निर्मितीमधील प्रमुख देश सध्या तैवानच आहे.

विशेष बाब म्हणजे जगात सर्वात आधुनिक चिपचा पुरवठा हा तैवानकडून केला जातो. कारण जगाच्या सेमीकंडक्टर उद्योगाच्या विक्रीच्या हिस्सेदारीत जवळपास 9 टक्के इतका वाटा तैवानचा आहे. अमेरिका आणि चीन यांच्यातील काळजी ही संपूर्ण जगासाठी चिंतेची बाब राहणार आहे. यामध्ये सेमीकंडक्टर उद्योगामध्ये पुरवठय़ावर होऊ शकतो.

या सर्व घडामोडींचा सर्वाधिक प्रभाव हा भारतीय कंपन्यांवर होण्याचे संकेत आहेत. यामध्ये जर का हा तणाव आगामी काळात वाढत गेला तर त्याचा परिणाम हा मोबाईल, टीव्ही, लॅपटॉपसह अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तुंच्या किमतीवर प्रभाव टाकणारा राहणार असल्याचेही सध्या म्हटले जाते.

Related Stories

‘थार’ वाहनाला उत्तम प्रतिसाद

Omkar B

वेदान्ताकडून कोरोनाशी लढण्यास 201 कोटीचे सहाय्य

Patil_p

एप्रिलमध्ये विजेचा वापर वाढला

Patil_p

मॅक्रोटेक लिमिटेडच्या उत्पन्नात वाढ

Amit Kulkarni

रिलायन्स रिटेलची ऍडव्हर्बमध्ये हिस्सेदारी

Patil_p

बायोकॉनचा डीकेएसएचसोबत करार

Patil_p
error: Content is protected !!