प्रतिनिधी/ पणजी
अर्जेटिनाच्या व्यक्तिमत्त्वाचे भाषांतर हे टँगोमध्ये होते जे नाटय़मय आणि उत्कटतेने भरलेले असते. केवळ टँगोसाठीच नव्हे तर चित्रपट निर्मितीच्या अतिशय मजबूत आणि प्रभावशाली इतिहासासाठीही अर्जेंटिना ओळखला जातो. 1896साली पॅरिसमध्ये लाँच झाल्यानंतर केवळ एक वर्षानंतर अर्जेंटिना ल्युमिएरचे सिनेमॅटोग्राफ आयात करणारा पहिला देश होता. जगातील पहिला ऍनिमेटेड चित्रपट ‘ऐ आपोस्टोल’देखील अर्जेंटिनामध्ये बनविण्यात आला होता. सिनेमाची एवढी समृद्ध परंपरा असलेल्या या देशातून गोव्यात 20 ते 28 रोजी दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या 53व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सात निवडक अर्जेंटिनियन चित्रपट दाखविण्यात येणार आहेत.
2021 सालातील रॉड्रीगो ग्युरेरो दिग्दर्शित ‘सेव्हन डॉग्ज’ आंचिममध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागात दाखविण्यात येणार आहे. सदर चित्रपट सुवर्ण मयूराच्या शर्यतीत आहे. ऍंड्रिया ब्रागा दिग्दर्शित ‘सेल्फ डिफेन्स’ हा चित्रपट सर्वोत्कृष्ट पदार्पण वैशिष्टय़ाच्या पुरस्काराच्या स्पर्धेत आहे. याशिवाय या महोत्सवात प्रदर्शित होणारे इतर अर्जेंटिनियन चित्रपट मिस विबोर्ग, द बॉर्डर्स ऑफ टाइम, द सबस्टिटय़ूट, रोब ऑफ जेम्स, आणि इआमी दाखविले जाणार आहेत.