वृत्तसंस्था/ इस्टोरिल (पोर्तुगाल)
एटीपी टूरवरील येथे झालेल्या इस्टोरिल खुल्या पुरूषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत अर्जेंटिनाच्या 21 वर्षीय सेबॅस्टियन बाएझने एकेरीचे जेतेपद मिळविताना फ्रान्सच्या टिफोईचा पराभव केला.
रविवारी झालेल्या पुरूष एकेरीच्या अंतिम सामन्यात बाएझने फ्रान्सच्या टायफोचा 6-3, 6-2 अशा सरळ सेटस्मध्ये पराभव केला. या जेतेपदामुळे आता एटीपीच्या ताज्या क्रमवारीत बाएझला पहिल्या 40 टेनिसपटूमध्ये स्थान मिळेल. इस्टोरिल स्पर्धेत बाएझने पहिल्या फेरीत सोसाचा त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत फ्रान्सच्या गॅसकेटचा तर उपांत्य फेरीत माजी विजेत्या अल्बर्ट रॅमोस-व्हिनोलासचा पराभव करत पुढील फेरी गाठली. तसेच त्याने तृतीय मानांकित मॅरीन सिलीक आणि पाचव्या मानांकित टायफा यांना पराभवाचा धक्का देत जेतेपद पटकाविले.