शिवसेना ठाकरे गट, भाजपने कारवाईला घेतला आक्षेप
कणकवली / प्रतिनिधी
कणकवली तहसिलदार कार्यालयाच्या आवारात हेल्मेट, सीटबेल्ट न लावलेल्या वाहन धारकांवर आरटीओ कडून सुरू असलेल्या कारवाईला शिवसेना, भाजपने आक्षेप घेतला. यावरून आरटीओ अधिकारी व कार्यकर्त्यांत जोरदार वादंग झाला. महामार्गावर कारवाई करा. तहसीलदार कार्यालयाच्या आवारात परवानगीशिवाय होणाऱ्या कारवाईला विरोध केला. अखेर तहसिलदार दीक्षांत देशपांडे यांच्याकडे झालेल्या चर्चेअंती आवारात केलेल्या कारवाईची रक्कम परत कण्याबाबत तोडगा काढण्यात आला . तसेच आधी जनजागृती करा, अशी मागणी कार्यकर्त्यांची केली आहे . यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, कन्हैया पारकर, राजू शेटये, सचिन सावंत, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष संदीप मेस्त्री, समीर प्रभुगवकर व इतर उपस्थित होते.