Tarun Bharat

अर्जुन यादव खूनाच्या गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई :मुंबई येथून दोघांना अटक

Advertisements

सातारा : शहरातील नटराज मंदिर परिसरात वाईच्या अर्जुन यादववर बेछुट गोळीबार करून त्यांचा खून करणारे दोन मुख्यसुत्रधार जेरबंद करण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.याप्रकरणी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आलेले होते. परंतु आरोपी अभिजीत उर्फ भैया शिवाजी मोरे (रा. गंगापुरी वाई), सोमनाथ बंडु शिंदे (रा. रविवारपेठ वाई) हे फरार झाल्याने त्यांचा शोध सुरू होता. अखेर स्थनिक गुन्हे शाखेने त्यांना मुंबई येथून अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ व त्यांच्या पथकाने खूनाच्या काही तासांत तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. यांच्याकडे चौकशी केली असता मुख्य सुत्रधार अभिजीत व सोमनाथ असल्याची माहिती समोर आली. या माहितीच्या आधारे पथके तयार करून आरोपींना शोधण्यासाठी पाठविण्यात आली. तोच अभिजीत व सोमनाथ हे दोघेही मुंबईतील मानखुर्द येथे असल्याची माहिती प्राप्त झाली. सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे व पथक तात्काळ मुंबईला रवाना झाले. त्यांनी दोन्ही आरोपींचा शोध घेऊन ताब्यात घेतले. असा संवेदनशील गुन्हा उघड करून गुन्ह्यातील सर्व 5 आरोपींना अटक करण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, पोलीस अंमलदार विश्वनाथ संकपाळ, अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, निलेश काटकर, गणेश कापरे, मुनीर मुल्ला, प्रमोद सावंत, अमित सपकाळ, विशाल पवार, रोहित निकम, सचिन ससाणे यांनी घेतला.

Related Stories

प्राजक्ताने खटावची मान दिल्ली तख्तावर उंचावली

Abhijeet Shinde

जादा पैसे घेतल्यास परवाना होणार निलंबित

datta jadhav

मलकापुरात कंटेनमेंट झोनची आयुक्तांनी केली पाहणी

Patil_p

खत विक्रेत्यांनी साठा आणि दराचे फलक दर्शनी भागात लावा : कृषिमंत्री भुसे

Abhijeet Shinde

लॉकडाऊनमध्ये पालिका निवडणूकीसाठी इच्छूकांकडून साखर पेरणी

Patil_p

सोयाबीन खरेदीत अल्पभूधारक शेतकऱ्यांना अनुदान

Abhijeet Shinde
error: Content is protected !!