Tarun Bharat

सैन्याला मिळाले स्वदेशी लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर

Advertisements

एचएएलकडून निर्मित

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) देशात निर्मित स्वदेशी लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर गुरुवारी भारतीय सैन्याला सोपविले आहे. एचएएलने आर्मी एव्हिएशन कॉर्प्सच्या महासंचालकांना हेलिकॉप्टर सोपविले आहे. सैन्य हे हेलिकॉप्टर कुठे तैनात करणार याचा खुलासा अद्याप करण्यात आलेला नाही. परंतु 3 ऑक्टोबर रोजी जोधपूर येथील तळावर या घातक हेलिकॉप्टरची एक स्क्वॉड्रन तैनात केली जाणार आहे.

एलसीएचची स्क्वाड्रन जोधपूरमध्ये तैनात झाल्याने पाकिस्तानला लागून असलेल्या सीमेवर नजर ठेवण्यास मदत होणार आहे. पुढील काळात ही स्क्वाड्रन चीन सीमेनजीकच्या वायुतळावर तैनात करण्यात येणार आहे. सैन्याकडून 95 लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर्स खरेदी करण्यात येतील.

एलसीएच 51.10 फूट लांबीचे अन् 15.5 फूट उंचीचे आहे. पूर्ण सामग्रीसह याचे वजन 5800 किलोग्रॅम इतके होते. तर 700 किलोग्रॅम वजनाची शस्त्रास्त्रs यातून वाहून नेता येतात. हे हेलिकॉप्टर कमाल 268 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने उड्डाण करू शकते तर याची कार्यकक्षा एकाचवेळी 550 किलोमीटर इतकी आहे. एकाचवेळी हे हेलिकॉप्टर सलग 3 तास 10 मिनिटांपर्यंत उड्डाण करू शकते.

ध्रूव हेलिकॉप्टरांच्या आधारावरच लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर विकसित करण्यात आले आहे. याची गरज 1999 मध्ये कारगिल युद्धादरम्यान जाणवली होती. हे हेलिकॉप्टर देशातील प्रत्येक भागात उड्डाण करण्याची क्षमता बाळगून आहे. सियाचीन तसेच वाळवंट अन् जंगली भागावरूनही हे हेलिकॉप्टर उड्डाण करू शकते.

लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टरवर 20 एमएमची एम621 कॅनन किंवा नेक्स्टर टीएचएल-20 टरेन गन बसविता येणार आहे. चार हार्डपॉइंट्समध्ये रॉकेट, क्षेपणास्त्रs किंवा बॉम्ब जोडता येणार आहेत.

Related Stories

भारताला दिवाळीची भेट – कॉव्हॅक्सिनला मान्यता

Patil_p

आंतरराष्ट्रीय विमानसेवा 31 डिसेंबरपर्यंत बंदच

Patil_p

दहशतवादी बिलालकडून डॉक्टर गुलची हत्या

Patil_p

77 वर्षीय आजींनी सुरू केला फूड स्टार्टअप

Patil_p

मुलांसाठीची लस सप्टेंबरपर्यंत शक्य

Patil_p

गेल्या 10 महिन्यापासून बंद असलेल्या ‘या’ राज्यातील शाळा आजपासून सुरू

Tousif Mujawar
error: Content is protected !!