उधमपूर
हिमालय पर्वतरांगांमधील उमासी ला खिंडीत रस्ता चुकलेल्या हंगेरियन वंशाच्या टेकरची सुरक्षा दलांनी सुखरूप सुटका केली आहे. या बचाव मोहिमेचा व्हिडीओ लष्कराने जारी केला आहे. संबंधित ट्रेकरची प्रकृती अत्यवस्थ असून त्याला उपचारासाठी उधमपूरला नेण्यात आले आहे. इकोस वर्म्स नामक हंगेरियन ट्रेकर हिमालय पर्वतरांगांमधील उमासी ला खिंडीत रस्ता चुकला होता. यासंबंधीची माहिती मिळताच किश्तवाड जिह्यातील दुल भागातील भारतीय लष्कर आणि हवाई दलाचे जवान ट्रेकरच्या शोधात निघाले होते. मदत व बचाव मोहिमेत त्याला सुखरूप वाचवण्यात यश आले आहे. आता आरोग्य तपासणीसाठी त्याला हवाई दलाच्या मदतीने उधमपूरला नेण्यात आले आहे.