क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
बेंगळूर येथे नम्म बॅडमिंटन चषक राज्यस्तरीय निमंत्रितांच्या बॅडमिंटन स्पर्धेत 13 वर्षांखालील गटात एकेरीत बेळगावच्या आरणा असुंडी हिने बेंगळूरच्या आकांक्षाचा 2-1 असा पराभव करून या गटातील विजेतेपद पटकाविले.
बेंगळूर येथे नम्म बॅडमिंटन चषक राज्यस्तरीय 13 वर्षांखालील मुलींच्या गटात बेळगावच्या आरणा असुंडीने उपांत्यपूर्व फेरीत मान्या हिचा 15-6, 15-10 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत 7 व्या मानांकित जयश्रीचा 15-11, 11-15, 15-5 असा पराभव करीत अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम फेरीत आरणाने तिसऱया मानांकित आकांक्षाचा 15-13, 11-15, 15-11 असा पराभव करून विजेतेपद पटकाविले. तिला मान्यंवरांच्या हस्ते चषक, प्रमाणपत्र व रोख रक्कम देवून गौरविण्यात आले. तिला बेळगाव जिल्हा बॅडमिंटन संघटनेचे प्रशिक्षक भूषण अणवेकर यांचे मार्गदर्शन लाभले तर संघटनेचे सचिव अशोक पाटील यांचे प्रोत्साहन मिळाले. ती सेंट जोसेफ स्कूलची विद्यार्थिनी आहे.