Tarun Bharat

अर्णिका गुजर भारतीय बास्केटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षक

प्रतिनिधी/ सातारा

भारतीय बास्केटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी साताऱयाच्या कन्या अर्णिका गुजर-पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर निवडीची घोषणा नुकतीच करण्यात आली असल्याने अर्णिका यांच्या या निवडीने सातारा जिह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडू ते प्रशिक्षक पदापर्यंतचा अर्णिका यांचा प्रवास आव्हानात्मक आणि दिशादर्शक असा राहिला आहे. त्यांना यापुर्वी अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. यापैकी प्रमुख म्हणजे शिवछत्रपती पुरस्काराच्या ही त्या मानकरी आहेत.

 अर्णिका गुजर यांचे शालेय शिक्षण सातारा इंग्लिश मिडियम स्कुलमध्ये झाले तर महाविद्यालयीन शिक्षण धनंजयराव गाडगीळ महाविद्यालयात झाले. त्यांना बास्केटबॉल या क्रिडा प्रकाराचे बाळकडु हे त्यांच्या आई-वडिलांकडुनच मिळाले आहे. बंगळूर येथे 5 ते 11 सप्टेंबर या कालावधीत होणाऱया महिला आशियाई अजिंक्यपद बास्केटबॉल स्पर्धेसाठी बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडियाने भारतीय संघाची घोषणा केली. या संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी अर्णिका गुजर- पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

  अर्णिकाच्या निवडीनंतर महाराष्ट्रासह साताऱयातील क्रीडाप्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे. या स्पर्धेत अ गटात चीन, जपान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया, न्यूझीलंड, चायनीज तैपेई, इंडोनेशिया आणि भारत हे देश असणार आहेत. तसेच ब विभागामध्ये मलेशिया, थायलंड, हाँगकाँग, सामोआ, मालदीव, जॉर्डन, मंगोलिया आणि फिलिपाइन्स हे देश असणार आहेत.

 बीएफआयने स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. त्याबाबतचे ट्विट देखील बीएफआयने केले आहे. भारतीय संघात नितिका अमुथन, दीप्ती राजा, सत्या कृष्णमूर्ती, मेखला गौडा, करणवीर कौर, कीर्ती देपली, मनमीत कौर, इरिन एल्सा जॉन पुथेनोराकल, यशनीत कौर, निहारिका रेड्डी मेकापती, भूमिका सिंग, हरिमा सुंदरी मुनीष्कन्नन यांचा समावेश आहे. संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी अर्निका पाटील, प्रशिक्षकपदी अनिथा पॉल दुराई, व्यवस्थापकपदी जरीन पीएस तसेच फिजिओथेरपिस्ट म्हणून अहाना पुराणिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 संपुर्ण कुटुंबच बास्केटबॉलमध्ये प्रविण

  अर्णिका गुजर यांचे वडील कै. रणजीत गुजर हे राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावरील बास्केटबॉलचे प्रशिक्षक होते. त्यांच्या आई कै. रुपाली गुजर यांनी ही महाराष्ट्राच्या टीमच्या मॅनेजरपद भुषविले आहे. त्यांची लहान बहिण मिथीला गुजर याही शिवछत्रपती पुरस्काराच्या मानकरी आहेत. भाऊ रोहन गुजर हे राष्ट्रीय खेळाडू असून त्यांचीही प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली होती. सध्या ते गुरूवार पेठ येथे रणजीत ऍकॅडमी चालवतात. त्याचबरोबर त्यांच्या वहिणी जिज्ञासा गुजर याही राष्ट्रीय खेळाडू आहेत. त्यामुळे त्यांचे संपुर्ण कुटुंबच बास्केटबॉल या खेळ प्रकारामध्ये प्रविण आहे.

Related Stories

महाराष्ट्र : दैनंदिन कोरोना रुग्णांची नोंद घटली

Tousif Mujawar

निम्या शहरातील कचरा तसाच पडून

Patil_p

पुन्हा सातार्‍यातील शासकीय कार्यालये कोरोनाच्या कचाट्यात

Archana Banage

कल्याणकारी महामंडळ गतीमान करा

Archana Banage

टीआर कार्पोरेशनच्या मालकास बेदम मारहाण

Patil_p

आरेतील मेट्रो कारशेड कांजूरमार्गमध्ये होणार

datta jadhav