Tarun Bharat

Solapur : परांडा आरोग्य शिबिरासाठी करमाळा तालुक्यातून वाहतूक व्यवस्था

करमाळा प्रतिनिधी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली परंडा येथील राज्यस्तरीय आरोग्य शिबिर 27 नोव्हेंबर रोजी होत असून या आरोग्य शिबिरात 500 तज्ञ डॉक्टरांच्या मदतीने रुग्णांची तपासणी केली जाणार असून रुग्णांना औषधोपचार शस्त्रक्रिया सुद्धा मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या आरोग्य शिबिरासाठी जाण्यासाठी करमाळा तालुक्यातील प्रत्येक गावातून वाहनाची व्यवस्था करण्यात येणार असून आरोग्य शिबिराचा फायदा घ्यायचा आहे, त्यांनी आपली नावनोंदणी करमाळा शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात करावी असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केले आहे. निवृत्त कर्मचारी संघटना अध्यक्ष प्रदीप शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते. 27 नोव्हेंबर परंडा येथे होणाऱ्या आरोग्य शरीरात प्रत्येक रुग्णाची सर्व प्रकारची तपासणी होणार आहे या ठिकाणी आलेल्या रुग्णांची जेवणाची नाश्त्याची सोय कारण्यात आली .

तपासणी झाल्यानंतर रुग्णांना मोफत चष्मे वाटप अपंगांना अपंगांचे साहित्य कर्ण दोष असणाऱ्यांना मशीन देण्यात येणार आहे. या आरोग्य शिबिरात एखाद्या रुग्णावर महागडी शस्त्रक्रिया करण्याची गरज असेल तर त्या रुग्णावर महाराष्ट्र शासनाच्या वतीने मोफत मोफत सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया करून दिले जाणार आहे.
महाराष्ट्र शासनाचा आरोग्य शिबिराचा फायदा प्रत्येक रुग्णाला व्हावा म्हणून रुग्णांना परंडा येथे येण्या जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या महा आरोग्य शिबिरात जाण्यासाठी इच्छुक असणाऱ्या रुग्णांनी करमाळा शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले.

Related Stories

सोलापुरात आज तब्बल 103 नवे रुग्ण, तिघांचा मृत्यू

Archana Banage

कोरोना : सोलापुरात उद्या केंद्रीय पथक येणार

Archana Banage

ज्यांनी मला मतदान केले, त्यांचा हा सत्कार : अजित पवार

prashant_c

सोलापूर ग्रामीणमध्ये कोरोनाने आठ जणांचा मृत्यू, 291 नवे रुग्ण

Archana Banage

सोलापूर : मुख्यमंत्री ठाकरेंनी साधला आष्टीच्या सरपंचाशी संवाद

Archana Banage

सोलापूर : तुंगतमधील बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल

Archana Banage
error: Content is protected !!