Tarun Bharat

राहुल गांधींना अटक करा; रणजित सावरकरांची मागणी

ऑनलाईन टीम/तरुण भारत

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) बिरसा मुंडे (Birsa Munda) यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या सभेत बोलताना स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्यावर केलेल्या टीकेनंतर राज्यातील राजकारण तापू लागले आहे. सावरकर यांचे नातू रणजित सावरकर (Ranjit Savarkar) यांनी काँग्रेसवर (Congress) पलटवार केला करत राहुल गांधींच्या अटकेची मागणी केली आहे.

दरम्यान, सावरकरांचे पणतू रणजीत सावरकर यांनी यावेळी राहुल गांधींना अटक करावी. तसेच उद्धव ठाकरेंनी सावरकरांबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणीदेखील केली. तसंच सावरकरांना भारतरत्न द्यावा ही आमच्या कुटुंबाची मागणी नाही, असं त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना स्पष्ट केलं आहे.

“सावरकरांची बदनामी केली तर आपल्याला मतं मिळतील असा राहुल गांधींचा समज आहे. पण यातून ते एका देशभक्तावर खोटे आरोप करत बदनामी करत आहेत. याआधीही त्यांनी असे उद्योग केले आहेत,” अशी टीका त्यांनी केली आहे. आपण दादर पोलीस ठाण्यात तक्रार करत असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

Related Stories

भारत जोडो’मध्ये रोहित वेमुलाच्या आईचा सहभाग

Patil_p

नागठाणे येथील फिरस्ते परप्रांतीयांना मदतीचा हात

Patil_p

सी.आर. केसवन यांचा काँग्रेस पक्षाला रामराम

Amit Kulkarni

प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांच्याकडे तक्रार दाखल मनसेचे राहूल पवार

Patil_p

अशोक लवासांनी सोडले निवडणूक आयुक्तपद

Patil_p

”एकतर महामारी त्यात पंतप्रधान अहंकारी”

Archana Banage