Tarun Bharat

संजय राऊतांना होणार अटक ?

Advertisements

ऑनलाईन टीम / मुंबई

मुंबईतील शिवडी न्यायालयाने शिवसेना नेते खा. संजय राऊत यांच्या विरोधात जामिनपात्र अटकेची नोटीस काढली आहे. भाजप नेते किरिट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्य़ा तक्रारीनुसार ही वॉरंट काढण्यात आली.

अधिक वाचा- बंडखोर आमदारांना उद्धव ठाकरेंचं उत्तर; म्हणाले, प्रेम खरं की खोटं

काही दिवसापुर्वी संजय राऊत यांनी किरिट सोमय्या यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. या आरोपांमध्ये त्यांनी सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांचा उल्लेख करून त्यांनीही भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. मेधा सोमय्या यांनी याविरूद्ध कोर्टात धाव घेऊन संजय राउत यांच्या अटकेची मागणी केली होती. मेधाचे वकील विवेकानंद गुप्ता यांनी सांगितले की, “माननिय न्यायालयाने आरोपी संजय राऊत यांनी उच्चारलेल्या शब्दांमुळे माझे अशिल मेधा सोमय्या यांच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचली आहे. त्यामुळे संजय राऊत यांना ५ हजार रुपयांचे जामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे.” महानगर दंडाधिकारी पीआय मोकाशी यांनी सांगितले की, “पुराव्यादाखल आलेल्या कागदपत्रे आणि व्हिडिओ क्लिपमध्ये प्रथमदर्शनी आरोपींनी बदनामीकारक विधाने केली आहेत असे दिसून आले आहे.” असे म्हटले आहे.

Related Stories

मनोहर भोसलेसह अन्य भोंदू बाबांच्या विरोधात भाविक एकवटले

Archana Banage

देशातील दोन राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील सर्व पात्र नागरिकांना मिळाली लस

Archana Banage

महाराष्ट्राला औषधांचा पुरवठा केल्यास तात्काळ कारवाई करु; मंत्री नवाब मलिक यांचा दावा

Tousif Mujawar

कोल्हापूर शहरात गेला पहिला कोरोनाचा बळी

Archana Banage

भारतीय रेल्वेने रचला इतिहास!

Tousif Mujawar

उदयनराजेंनी शरद पवारांची घेतली भेट

Archana Banage
error: Content is protected !!