सीआयडीची यशस्वी कारवाई
प्रतिनिधी / पणजी
माथिएस कन्स्ट्रक्शन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक ज्यो माथिएस यांना धमकावून 20 कोटी रुपयांची खंडणी मागणाऱयाला गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी (सीआयडी) अटक केली आहे. त्याच्या विरोधात भादंसंच्या 384 कलमाखाली गुन्हा नोंद केला असून त्याच्याकडील एमएच-31-एफआर-7602 क्रमांकाची कारही जप्त केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या संशयिताचे नाव प्रकाश अगरवाल असे आहे. संशयित दोनापावला येथे एका फ्लॅटमध्ये राहत होता. माथिएस कन्स्ट्रक्शन कंपनीच्या कार्यालयात जाऊन ज्यो माथिएस यांना धमकी देत होता. त्या बदल्यात 20 कोटी रुपयांची खंडणी मागत होता यापैकी काही रक्कम त्याने धनादेशद्वारा बळजबरीने घेतली होती. प्रकरण वाढत जात असल्याने ज्ये माथिएस यांनी सीआयडी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तपास करून अवघ्या काही दिवसांतच त्याला अटक करण्यात यश मिळविले. सीआयडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.