मडगाव : कोलवा समुद्रकिनारी दोन ट्रॉलर्सना आग लावल्याच्या आरोपावऊन कोलवा पोलिसांनी वाडी -बाणावली येथील राफिलीयो फर्नाडिस याला अटक केली आहे. पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार ‘सेंट अँथनी’ नावाने ओळखण्यात येणाऱ्या आणि सरकार दरबारी नोंदणी केलेल्या दोन ट्रॉलर्सना 26 फेब्रुवारी 2023 रोजी पहाटेच्यावेळी काही अज्ञात आरोपींनी आग लावली होती. या प्रकरणी कोलवा पोलीस स्थानकात भारतीय दंड संहितेच्या 435 कलमाखाली गुन्हा नोंद केला होता. मडगावचे पोलीस उपअधीक्षक संतोष देसाई यांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस निरीक्षक थॅरन डिकॉश्ता, उपनिरीक्षक सुभाष गावकर व इतर पोलीस कर्मचाऱ्यासह एक पथक तयार करण्यात आले होते.पोलीस तपासात एक संशयित व्यक्ती त्या रात्री कोलवा समुद्रकिनारी असल्याचे आढळून आले होते. त्या संशयिताला पोलिसांनी पोलीस स्थानकात आणून त्याची चौकशी केली तेव्हा या गुन्ह्यात आपला हात असल्याची कबुली वरील आरोपीने दिल्यानंतर या आरोपीला वरील कायद्याखाली अटक करण्यात आली.
Previous Articleवास्को अपघातातील जखमीचा मृत्यू
Next Article पारोडा येथील खून प्रकरणात 48 तासांत संशयिताला अटक
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.