प्रतिनिधी /फोंडा
पणसुले-धारबांदोडा येथून दोन पाण्य़ाचे पंप व ट्रकच्या बॅटऱया चोरीप्रकरणी फोंडा पोलिसांनी दोघा संशयिताना अटक करण्यात आली आहे. राजेशकुमार महादेवप्पा कुमार (रा. उसगांव मूळ कर्नाटक) व शरथ आनंद नाईक (रा. उसगांव मूळ ओरीसा) अशी त्या संशयितांची नावे आहेत. चोरीची घटना मागील काही दिवसापुर्वी घडली होती.
फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजेश कुट्टीकर यांनी याप्रकरणी रितसर तक्रार दाखल केली होती. पणसुले तिस्क-उसगांवजवळील राजेश यांच्या फार्महाऊसातून दोन पाण्याचे पंप व ट्रकची बॅटरी अज्ञाताने लांबविल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. अटक करण्यात आलेल्या दोघा संशयितानी चोरीची कबूली दिली आहे. एका संशयिताची तब्येत बिघडल्यामुळे त्याला सरकारी इस्पितळात भर्ती करण्यात आले आहे. याप्रकरणी हवालदार रघुनाथ गावस अधिक तपास करीत आहे. मागील काही दिवसापासून फोंडा पोलिसांच्या हाती तुरी देऊन पसार होणाऱया चोरटय़ांना पकडण्यात फोंडा पोलिसांना तात्पुरते यश हाती लागले आहे. लाखो रूपये किमतीचे सोन्याचे दागिने लांबविणाऱया चोरटय़ाच्या मुसक्य़ा आवळण्यात मात्र फोंडा पोलिसांना अद्याप यश आलेले नाही.