Tarun Bharat

निलजीत धर्मवीर छ.संभाजी महाराज मूर्तीचा आगमन सोहळा उत्साहात

वार्ताहर /सांबरा

निलजी येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीचा आगमन सोहळा भगवेमय वातावरणात व जल्लोषात पार पडला. मुतगे येथील प्रसिद्ध मूर्तिकार एम. जी. पाटील यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती बनविली आहे. मुतगे येथून आगमन सोहळय़ाला प्रारंभ झाला. प्रारंभी श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर व काकतीवेस रोड येथील प्रसाद मेडिकल्सचे मालक सी. के. पाटील यांनी पूजन करून मिरवणुकीस चालना दिली. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. त्यानंतर मिरवणूक मुतगे येथून बेळगाव-बागलकोट रोडमार्गे निलजी गावात पोहोचली. मिरवणुकीत ढोल-ताशे, लेझीम पथक सहभागी झाले होते.

सर्वजण पारंपरिक पोशाख परिधान करून मिरवणुकीत सहभागी झाले होते. भगवे फेटे, भगवे ध्वज व भगवे पोशाख यामुळे परिसर भगवेमय झाला होता. गावामध्ये ठिकठिकाणी मूर्तीचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत मिरवणूक सुरू होती. त्यानंतर मूर्ती धर्मवीर संभाजी चौकातील चौथऱयावर बसविण्यात आली.

आगमन सोहळा यशस्वी करण्यासाठी श्रीराम सेना हिंदुस्थानचे तालुकाप्रमुख भरत पाटीलसह संदीप मोदगेकर, लखन मोदगेकर, प्रताप मुकुंद, भरत वर्पे, रवी गाडेकरसह इतर कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

मूर्तीचा अनावरण सोहळा लवकरच करण्यात येणार असून अनेक मान्यवरांना आमंत्रित करण्यात येणार आहे. हा सोहळाही मोठय़ाने करण्यासाठी कार्यकर्ते तयारीला लागले आहेत. गावामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती बसविण्यात येणार असल्याने उत्साहाचे वातावरण पसरले आहे. 

Related Stories

रोटरॅक्ट क्लब ऑफ केएलई सिबाल्कचा अधिकारग्रहण सोहळा

Patil_p

पूरस्थितीबाबत आज उच्चस्तरिय बैठक

Patil_p

शिवशक्ती, मि.परमार, रॉयल स्ट्रायकर संघ विजयी

Amit Kulkarni

कपिलेश्वर उड्डाणपुलावर वाहतुकीची प्रचंड कोंडी

Amit Kulkarni

पशुवैद्यकीय मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्या लोकार्पण

Amit Kulkarni

औद्योगिक वसाहत सुरू करण्यास सशर्त परवानगी

Patil_p