क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
राष्ट्रीय योगा ऑलिम्पियाड स्पर्धेत गोव्याला रौप्यपदक मिळवून दिलेल्या खेळाडूंच्या समवेत क्रीडा खात्याचे अधिकारी तुळशीदास देसाई व मंथन आडपईकर
नवी दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय योगा ऑलिम्पियाड स्पर्धेत गोव्याने सांघिक रौप्यपदक मिळविलेल्या गोव्याच्या संघाचे काल दिल्लीहून मडगाव रेल्वे स्थानाकावर आगमन झाले. त्यांच्या स्वागताला योगासान खेळाचे प्रेमीं, खेळाडूंचे पालक तसेच क्रीडा खात्याचे अधिकारी तुळशीदास देसाई व मंथन आडपईकर हे उपस्थित होते. या स्पर्धेचे आयोजन एनसीईआरटीने केले होते. क्रीडा खात्याने या स्पर्धेत 12 खेळाडूंना पाठविले होते.
या स्पर्धेत अप्पर प्रायमरी मुलींच्या विभागात गोव्याच्या याशिका चेवली, मनस्वी दास, इमा पाटील व शिवून देसाई यांनी गोव्याला सांघिक गटात रौप्यपदक प्राप्त करून दिले. गोव्याच्या संघाला प्रशिक्षक विशाल गावस यांचे प्रशिक्षण व मार्गदर्शन लाभले होते.