प्रतिनिधी / बेळगाव
हिंडलगा गणपती मंदिराजवळ, वेंगुर्ला रोड, बेळगाव येथील ‘गॅरेज कॅफे’मध्ये अनोख्या ‘आर्ट क्राफ्ट आणि म्युझिक मेळय़ा’चे आयोजन दि. 23 व 24 एप्रिल रोजी दुपारी 4 ते रात्री 9 यावेळेत करण्यात आले आहे. पुरस्कार विजेते कलाकार श्रीकृष्ण अनसुरकर यांच्या कला आणि श्री हस्तकला केंद्र, बेळगाव यांच्या क्राफ्टद्वारे पॉटरी आर्ट वर्कच्या परिपूर्ण मिश्रणाचा अनुभव व रोहित आणि आहानच्या लाइव्ह म्युझिकल परफॉर्मन्सचा आनंद घेण्याची सुवर्ण संधी बेळगावकरांना मिळणार आहे. 8861876588 या क्रमांकावर फोन करून बुकिंग करायचे आहे. चित्रकला व हस्तकला शिकत वेगवेगळय़ा पदार्थांचा आनंद घेण्याचा लाभ समस्त बेळगाव कलाप्रेमींनी घ्यावा, असे आयोजकांतर्फे कळविण्यात आले आहे.