प्रतिनिधी /पणजी
ची. विठ्ठल ढेंपो , अवघ्या 16 वषीय मुलाला एका अद्वितीय कलेचा आशीर्वाद प्राप्त आहे. गेली अनेक वर्षे त्यांनी अतिशय परिश्रमाने आणि आपल्या कल्पक बुद्धीने एका पेक्षा एक छायाचित्रण केलेले आहेत.
त्याच्या ह्या सार्जनशील कलाकृतीला चांगला वाव मिळावा म्हणून त्यांनी आपल्या कॅमेऱयातून टिपलेल्या चित्रांचे प्रदर्शन आर्ट गलेरी, कला आणि संस्कृती संचालनालय संस्कृती भवन पाटो, पणजी गोवा येथे दिनांक 11 ऑगस्ट 2022 रोजी आयोजित करण्यात आले आहे . ह्या प्रदर्शनाच्या विक्रीतुन जी रक्कम येईल ती “एलशदाई ट्रस्टला’’ देणगी म्हणून दान केली जाईल.
अश्या कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी सर्व गोमंतकिय कला प्रेमिनी ह्या छोटय़ा छायाचित्रकाराच्या कला प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी व आयोजकांना उपकृत करावे हीच विनंती.