प्रतिनिधी /पणजी
विधानसभा अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी 16 जानेवारीपासून विधानसभा परिसराभोवती कलम 144 लागू करण्याचा आदेश उत्तर गोवा जिल्हा दंडाधिकाऱयांनी काढला आहे.
विधानसभेचे हिवाळी अधिवेशन 16 ते 19 जानेवारी या दरम्यान चार दिवस होणार आहे. संमेलन आयोजित करणे, पाच किंवा अधिक व्यक्ती एकत्र न येणे, मिरवणुका काढणे किंवा आयोजित करण्यास मनाई, धारदार शस्त्रे न बाळगणे; लाउडस्पीकरचा वापर; घोषणाबाजी देण्यास बंदी राहणार आहे. विधानसभा संकुलाच्या आजूबाजूच्या 500 मीटरच्या परिघात आणि पणजी पोलिस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, रस्ता, चौक, किंवा कोणत्याही मोकळय़ा जागी कोणतेही कार्यक्रम वा सभा घेता येणार नाहीत. 16 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजल्यापासून 144 कलम लागू राहणार असून, ते विधानसभेचे अधिवेशन संपेपर्यंत लागू राहील.