Tarun Bharat

पार्सेतील भाजप संमेलनात कलाकार, शेतकऱयांचा गौरव

Advertisements

पतिनिधी /पेडणे

 गोवा भाजपातर्फे मांदे आणि पेडणे मतदारसंघातील विविध क्षेत्रात भरीव कार्य करणाऱया व्यक्तींना सहकार मंत्री सुभाष शिरोडकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. पंतपधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीला 8 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पार्से येथे संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

 सत्कारमूर्तीमध्ये तांबोसे-  मोप – उगवे ग्रुप ग्रामपंचायत क्षेत्रातील मूर्तिकार जनार्दन परब, पगतशील शेतकरी अशोक परब (मोप), ज्ये÷ संगीत शिक्षक नाना आसोलकर (तांबोसे) यांचा समावेश होता. यांच्याबरोबरच विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱया 50 हून अधिक व्यक्तींचा यावेळी सत्कार करण्यात आला. 

तालुक्मयातील पार्से येथील ग्रामपंचायत सभागृहात आयोजित संमेलनात नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थितीत होते. यापसंगी उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष सिद्धेश नाईक, माजी आमदार दयानंद सोपटे, जि पं. सदस्य सीमा खडपे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.  

  मंत्री शिरोडकर यांच्या हस्ते जनार्दन परब यांना शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. मोप गावातील मूर्तिकार जनार्दन परब यांनी चुलते सोमा परब यांच्याकडून मूर्तिकलेचे धडे गिरवले आणि त्यांच्या गणेश मूर्तिकलेचा वारसा जोपासला आहे. गावातील बहुतांशी गणेशमूर्ती परब यांच्या मूर्ती शाळेत तयार होतात. मूर्ती शाळेत मदत करता करता त्यांनी ही कला आत्मसात केली.  दुसरे गौरवमूर्ती मोप गावातील समाजसेवक, शेतकरी अशोक आनंद परब हे राजकारण, समाजकारण आणि शेती या क्षेत्रात सकियपणे कार्यरत आहेत. त्यांनी अनेक हौशी नाटकांत भूमिका साकारल्या आहेत. तसेच शेती, दुग्ध व्यवसायात विविध प्रयोग करून ते अन्य शेतकऱयांनाही मार्गदर्शन करत असतात.

   तिसरे सन्मानमूर्ती तांबोसे गावचे ज्ये÷ संगीत शिक्षक नाना आसोलकर यांचे भजन आणि नाटय़ चळवळीत मोठे योगदान आहे. श्री गुरूकृपा संगीत संस्थेच्या माध्यमातून ते मुलांना संगीताचे धडे देत आहेत. तसेच गोवा आणि सिंधुदुर्गातील अनेक हौशी नाटकांना त्यांनी संगीतबद्ध केले आहे.

Related Stories

जमावबंदी प्रकरणी म्हापशात सहा जणांना अटक सुटका

Omkar B

विशांती कौठणकर यांचे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतकडून अभिनंदन

Patil_p

फर्मागुडी किल्ल्यावर शिवराज्यभिषेक दिन साजरा

Amit Kulkarni

विजय सरदेसाई यांनी घेतली लक्ष्मीकांत पार्सेकर यांची भेट

Amit Kulkarni

ताळगांव पंचायतघर प्रकल्पाचे काम पूर्ण बेकायदेशीर

Omkar B

प्रभाग 22 मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद दामोदर नाईक यांचा दावा

Amit Kulkarni
error: Content is protected !!