स्व. फटी गावकर स्मृती संगीत संमेलनात शौनक अभिषेकी,अक्षय नाईक यांचे गायन रंगले
प्रतिनिधी /वाळपई
सुप्रसिद्ध गायक शौनक अभिषेकी यांचे दर्जेदार गायन व गोमंतकीय युवा गायक कलाकार अक्षय नाईक यांचे सरस सादरीकरण यामुळे ठाणे सत्तरी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या कै. फटी गावकर स्मृती संगीत संमेलनात रसिका प्रेक्षकांना चांगलीच मेजवानी मिळाली. मोठय़ा प्रमाणात उपस्थित असलेल्या प्रेक्षकामुळे हे संगीत संमेलन उत्साहात संपन्न झाले. यावेळी अनेक कलाकारांनी गायन, तबलावादन संवादिनी वादन ,पखवाज वादन असे वेगवेगळय़ा क्षेत्रातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले.
ठाणे सत्तरी येथील नवदुर्गा देवस्थानच्या सभा मंडपात या चौथ्या संगीत संमेलनाचा समारोप स्थानिक आमदार तथा गोवा वनविकास महामंडळाच्या चेअरमन डॉ. देवीया राणे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी बोलताना आमदार डॉ. देविया राणे यांनी सांगितले की संमेलनाच्या माध्यमातून कलाकारांना एक वेगळी प्रकारची ओळख निर्माण होत असते. प्रत्येकाच्या अंगामध्ये कला असते. मात्र या कलेला व्यासपीठ उपलब्ध होणे गरजेचे असते. यासाठी संमेलनाचे आयोजन हा सुकर मार्ग आहे.
शास्त्रीय संगीत ही अवघड कला आहे. तरीसुद्धा सत्तरी तालुक्मयातील मुले आज या क्षेत्रामध्ये संशोधन करताना दिसत आहेत. ही खरोखरच कौतुकाची बाब आहे. या कलाकारांच्या पाठीवर सातत्याने कौतुकाची थाप पडावी यासाठी संगीत संमेलनाच्या आयोजन होणे ही काळाची गरज आहे. कै. फटी गावकर हे पारंपारिक भजनी कलाकार होते. त्यांनी आपल्या कलेच्या जोरावर अनेक भजनी कलाकार तयार केले. भजनी कलाकाराना सातत्याने प्रोत्साहित करून त्यांनी भजनी कलेला ग्रामीण भागामध्ये संजीवनी प्राप्त करून देण्याचे कार्य केले. यामुळे त्यांच्या नावाने सुरू झालेले संगीत संमेलन हे प्रत्येकासाठी आपलेपणा निर्माण करणारी प्रक्रिया असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
अशा संमेलनात आर्थिक बाजू कमी पडणार नाही याची विशेष दखल आपण घेणार असून येणाऱया काळात या क्षेत्रामध्ये उन्नती व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.
याप्रसंगी व्यासपीठावर ,ठाणे पंचायत सरपंच सरिता गावकर, संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मण गावस, माजी जिल्हा पंचायत सभासद पांडुरंग गावकर, सचिव झिलू गावकर, कार्याध्यक्ष उत्तम गावकर आदी उपस्थित होते.
प्रस्ताविक झिलू गावकर यांनी यावेळी बोलताना सांगितले की ग्रामीण भागामध्ये निर्माण झालेल्या गायक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी संगीत संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाच्या निमित्ताने वेगवेगळय़ा प्रकारच्या कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
सत्तरी तालुक्मयाची नवीन ओळख निर्माण झाली आहे.काणकोण ते पेडणे पर्यंत कलाकारांना या संगीत संमेलनात सहभागी करून घेण्यात आले आहे. पारंपारिक भजनी कलाकारांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे.
ठाणे सरपंच सरिता गावकर यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना फटी गावकर यांच्या अनेक आठवणी उजाळा दिला. भजनीकले बरोबरच सामाजिक क्षेत्रातही त्यांनी चांगल्या प्रकारची प्रतिमा निर्माण केली .यामुळे त्यांच्या जाण्याने समाजामध्ये पोकळी निर्माण झाली असून संगीत संमेलनाच्या माध्यमातून ही पोकळी भरून काढण्याचा करण्यात आलेला प्रयत्न चांगला असल्याचे उद्गार काढले.
पारंपारिक भजनी कलाकार पांडुरंग फोंडू च्यारी(सालेली), दयानंद गावस(मासोर्डे) यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सुत्रसंचलन सुभाष जाण यांनी केले तर शेवटी लक्ष्मण गावस यांनी आभार मानले.