अटकेसह सीबीआय कोठडीला आव्हान
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणात अडकलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अबकारी धोरण प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या अटकेला आणि सीबीआय कोठडीला आव्हान दिले आहे. 26 जून रोजी सीबीआयने केजरीवालांचा ताबा घेतल्यानंतर न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली होती. केजरीवाल यांची सीबीआय कोठडी संपल्यानंतर 29 जून रोजी त्यांना राऊस अॅव्हेन्यू न्यायालयात हजर करण्यात आले. या सुनावणीनंतर राऊस एव्हेन्यूच्या विशेष सीबीआय न्यायालयाने केजरीवाल यांना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत तिहारला पाठवले. त्यापूर्वी मद्य धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती. तेव्हापासून केजरीवाल तिहार तुऊंगात आहेत.