प्रतिनिधी/ गोडोली
राष्ट्रीय युथ बॉस्किंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱया सातारच्या आर्या बारटक्के हिने आता ऑलिंपिकमध्ये देशाचे नेतृत्व करावे. यासाठी माझ्या जिह्याच्या या बॉक्सर लेकीला लागेल ती मदत करणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
चेन्नई येथे पार पडलेल्या पाचव्या युथ मुलींच्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सातारा जिल्हा आणि राजधानी स्पोर्ट्स ऍकॅडमीची खेळाडू आर्या देवेंद्र बारटक्के हिने 54 ते 57 किलो वजनी गटामध्ये महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करत राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. सातारा जिह्याला राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेतले पहिले सुवर्णपदक मिळवून देण्याचा मान मिळवला. मुख्यमंत्र्यांना हे समजताच त्यांनी खेळाडू व प्रशिक्षकांना बोलवून घेऊन मुंबई येथे त्यांचा सत्कार केला. आर्या बारटक्के हिच्या पाठीवर शाबासकीचा हात ठेऊन पुढील कारकिर्दीसाठी मुख्यमंत्र्यांनी यावेळी यापुढेही ऑलिंपिकमध्ये तू नेतृत्व करण्यासाठी तयारी करावी. भविष्यामध्ये भारताला ऑलिम्पिकमध्ये देखील सुवर्णपदक मिळवून आपल्या सातायाचा अभिमान जागतिक स्तरावर वाढवण्यासाठी तिला शुभेच्छा दिल्या.
सत्कार प्रसंगी निलेश मोरे, मुख्य प्रशिक्षक अमित सागवान, विजय कांबळे, सागर जगताप आणि राजधानी स्पोर्ट्स ऍकॅडमी अध्यक्ष मंगेश जाधव, उपाध्यक्ष देवेंद्र बारटक्के, सचिन दीक्षित, सुनील इंगवले, रमेश शिंगटे, अभिजीत सपकाळ, संकेत नवघणे उपस्थित होते.