मिळवले कास्य, जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे यांनी केले कौतुक
प्रतिनिधी/ सातारा
भारताच्या महिला बॉक्सर मेरि कोम हिच्याप्रमाणे साताऱयातूनही कोणीतरी महिला बॉक्सर घडावे असे सातारकरांना वाटत असतानाच साताऱयातील आर्या बारटक्के हिने ती कमाल केली आहे. तिने सार्बिया येथे आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सहभाग घेऊन सार्बियाच्या महिला बॉक्सरला ठोसा लगावून ब्रॉन्झ मेडल मिळवले. तिचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. सातारा जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे यांनी तिचे कौतुक केले आहे.
साताऱयातील बांधकाम व्यावसायिक देवेंद्र बारटक्के आणि ज्योती बारटक्के यांची कन्या आर्या हिला खेळात जायचे होते. तिने आपली ही इच्छा आईवडिलांकडे आठवीत असताना व्यक्त केली आणि त्यांनी लगेच बॉक्सिंगसाठी निवड करुन तिला बॉक्सिंगचे प्रशिक्षक अमित सागवान यांच्याकडे सुरु केले. तिने शाळेच्या कार्यकाळात घौडदौड सुरुच ठेवली. परंतु महाविद्यालयीन काळातही तिने जिल्हा पातळीवर आणि राज्य पातळीवर ठसा उमटवला. तिचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पोदार इंटरनॅशनल स्कूलला तर उच्च माध्यमिक शिक्षण शाहु ऍकॅडमीत घेतले असून सध्या स्व. यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालयात पहिल्या वर्षात शिकते आहे. तीने सीबीसी नॅशनल गोल्ड मिळवले असून तीन वेळा खेलो इंडियात सहभाग घेतला होतो. सध्या 13 ते 18 या कालावधीत सार्बियात बॉक्सिंगची स्पर्धा पार पडली. त्यामध्ये सार्बिंयाच्याच बॉक्सरला आर्याने हरवून ब्राँझ पदक पटकावले. त्याबद्दल तिचे अभिनदन होत आहे.
तिने देशासाठी काहीतरी करावे
माझ्या मुलीने हे जे यश मिळवले आहे. त्याबद्दल मला तिचा अभिमान आहे. तीने देशासाठी काहीतरी करावे असे मला वाटते. तिने आज मिळवलेले यश हे तिच्यासाठी आणखी पुढच्या यशाची पायरी आहे.
देवेंद्र बारटक्के
तिच्या आईवडिलांचा अभिमान आहे
एक मुलगी असून तिला बॉक्सिंग या खेळात तिच्या आईवडिलांनी उतरवले ही खूप अभिमानाची बाब आहे. आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत मेडल मिळवणारी ती एकमेव साताराची मुलगी आहे. तिचीच प्रेरणा घेवून सातारा जिह्यातील इतर मुलीही या खेळात येतील. बॉक्सिंग या खेळामध्ये सातारा जिल्हा राज्यात आठव्या क्रमांकावर आहे.
राजेंद्र चोरगे, जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष