प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव जिल्हा पशुसंगोपन खात्याचे उपनिर्देशक डॉ. ए. के. चंद्रशेखर हे 31 मे रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या जागी नवीन जिल्हा उपनिर्देशक म्हणून डॉ. राजीव कुलेर यांची नियुक्ती झाली आहे.
डॉ. ए. के. चंद्रशेखर यांनी जिल्हा उपनिर्देशक म्हणून उत्तमपणे जबाबदारी सांभाळली होती. शिवाय कोरोना काळात देखील पशुपालकांच्या गोठय़ापर्यंत सेवा पुरविण्यात यशस्वी झाले होते. त्यांच्या जागी आता डॉ. राजीव कुलेर हे जिल्हा उपनिर्देशक म्हणून काम पाहणार आहेत.