Tarun Bharat

पृथ्वीचे तापमान वाढल्याने माणसाची उंची खुंटणार

Advertisements

एडिनबरो युनिव्हर्सिटीतील संशोधनाचा निष्कर्ष

हवामान बदलामुळे पृथ्वीच्या ग्रीन हाउस वायूंवर प्रभाव पडत आहे. यामुळे पृथ्वीचे तापमानही दिवसेंदिवस वाढतेय. याचा प्रभाव केवळ बर्फ वितळणे आणि समुद्राची पातळी वाढण्याशी संबंधित नाही, तर पृथ्वीचे तापमान वाढण्यासह माणसांचा आकारही कमी होत जाणार आहे.

एडिनबरो विद्यापीठात यासंबंधी संशोधन झाले आहे. तप्त हवामानानुसार स्वतःमध्ये बदल घडवून आणण्यासाठी माणसांची उंची कमी होत जाणार आहे. माणसांची सरासरी उंची सुमारे 3.5 फूटांपर्यंत कमी होण्याची शक्यता असल्याचे संशोधनात म्हटले गेले आहे.

हवामान बदलाच्या स्थितीत जिवंत राहण्यासाठी मानवाचा आकार घटणार असल्याचे उद्गार विद्यापीठातील जीवाश्म शास्त्राचे प्राध्यापक स्टीव ब्रूसेट यांनी काढले आहेत. उष्ण क्षेत्रांमध्ये सस्तन प्राणीन थंड क्षेत्रांमधील सस्तन प्राण्यांच्या तुलनेत कमी आकाराचे असतात. कारण छोटा आकार जीवांना थंड ठेवण्यास मदत करतो असे त्यांनी ‘द राइज अँड रीन ऑफ द मॅमल्स’ या स्वतःच्या पुस्तकात म्हटले आहे.

इंडोनेशियन बेट फ्लोर्समध्ये सुमारे 50 हजार ते 1 लाख वर्षांपूर्वी माणसांचे वय केवळ 3.5 फूटच होती. आमची प्रजाती अन्य प्राण्यांसाठीही हानिकारक राहिली असल्याचे ब्रूसेट यांनी होमो फ्लोरेसेंसिसचे उदाहरण देत म्हटले आहे.

तापमान आणि शरीराच्या आकारादरम्यान संबंध असतो असे 2021 च्या एक अध्ययनात समोर आले आहे. परंतु तापमानाचा मेंदूच्या आकारावर कुठलाच प्रभाव पडत नाही. तापमान वाढल्याने साधनसामग्रीनुसार मनुष्य किंवा अन्य सस्तन प्राणी देखील कमी आकाराचे होत जातील.

Related Stories

पाकिस्तानात लसीकरणासाठी हाहाकार

Patil_p

माणसांमध्ये परतला ‘मोगली’

Patil_p

भारताशी लढण्याचे बळ नाही

Patil_p

महामारीतही न घाबरता प्रवास करा!

Patil_p

मशिदीतील स्फोटात पाकिस्तानात 57 ठार

Patil_p

किम कार्दशियनने खरेदी केले विमान

Patil_p
error: Content is protected !!