प्रतिनिधी /कुंकळ्ळी
बाळ्ळी येथील आदर्श कृषी संस्थेच्या नवीन संचालक मंडळाची बिनविरोध निवड झाली असून या मंडळाच्या अध्यक्षपदी प्रकाश शंकर वेळीप यांची बिनविरोध फेरनिवड झाली आहे. तसेच उपाध्यक्षपदी सतीश बी. वेळीप यांचीही बिनविरोध निवड झाली आहे. हे मंडळ 2022 ते 2027 पर्यंतच्या पाच वर्षांच्या कालावधीत कार्यरत रहाणार आहे. या मंडळातील ज्योती पी. वेळीप व प्रशांत व्ही. वेळीप या दोन संचालकांची मंडळावर प्रथमच निवड झाली आहे. संस्थेची विशेष सभा सोमवारी बोलावण्यात आली होती. यावेळी वेगवेगळय़ा विषयांवर चर्चा झाली. निवड झालेल्या संचालक मंडळावर वरील चार जणांखेरीज संचालक दत्ता एस. गावकर, लक्ष्मण गो. वेळीप, विठोबा एस वेळीप, शोभना एस. वेळीप, अनंत एस. गावकर, भिक्रू जी. वेळीप यांचा समावेश आहे. यावेळी विनोद नाईक यांनी निर्वाचन अधिकारी म्हणून काम पाहिले.