कोल्हापूर : कोल्हापुरातल्या शिरोळ तालुक्यातील दानवाड ते कर्नाटकातील एकसंभाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याचा अंदाज न आल्याने चारचाकी वाहन थेट दुधगंगा नदीत गेल्याची घटना घडली आहे. काल गुरुवारी ही घटना घडली असून वाहन चालकाला रेस्क्यू करून काढण्यात आले आहे. सुदैवाने या गंभीर घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. परसगोंडा पाटील आणि प्रशांत पाटील हे दोन माजी सैनिक सकाळी वॉकिंगसाठी गेले असता ही घटना त्यांच्या त्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तात्काळ दोरीच्या साहाय्याने ड्रायव्हरला बाहेर काढले. या घटनेचा व्हिडिओ सध्या समोर आला आहे.
हे ही वाचा : Kolhapur: मजरे कार्वे येथे चार चाकी गाडी नदीत