भाजपाच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्यानंतर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी हे आक्रमक झाले आहेत. त्यांनी नुपूर शर्मा यांना अटक करण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. आज नांदेडमध्ये प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली.
पंतप्रधानांच्यावर निशाणा साधताना ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पक्षाने देशातील २० कोटी अल्पसंख्यांक मुस्लिमांविरोधात द्वेषाचं वातावरण निर्माण केलं आहे. म्हणूनच त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते अशाप्रकारची वायफळ बडबड करत आहेत. ट्विटर आणि फेसबुकवर पंतप्रधान मोदींबद्दल काहीही बोलणारे व्हिडीओ कोणी पोस्ट केले तर तुम्ही त्यांना २४ तासांमध्ये अटक करता. मग आता प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्यानंतर तुम्ही तुमच्या प्रवक्त्यांना अटक का करत नाहीत असा सवालही त्यांनी केला. यावेळी भिवंडीच्या सभेमध्ये केलेल्या वक्तव्याचीही त्यांनी आठवण करुन दिली.
पुढे बोलताना ते म्हणाले, भाजपाच्या प्रवक्त्यांनी एका वृत्तवाहिनीवर प्रेषित मोहम्मद यांचा अपमान केल्यानंतर १० दिवसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी कारवाई करतात.मात्र त्यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल की त्यांना लगेच अटक केली जाते असा आरोपही त्यांनी केला.


previous post