गुजरातमधील गांधीनगर सत्र न्यायालयाने आज जवळजवळ दशकभर जाललेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाच्या खटल्यात स्वयंघोषित धर्मगुरू आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आज गांधीनगर सत्र न्यायालयाने असाराम एक “सराईत गुन्हेगार” असल्याचे म्हटले आहे. आसाराम बापूविरुद्ध दाखल झालेल्या बलात्काराच्या गुन्ह्यात स्वयंघोषित धर्मगुरूला मोठ्या रकमेच्या दंडासह ही जन्मठेपेची शिक्षा झाली.
गांधीनगर सत्र न्यायालयाने सोमवारी (३० जानेवारी) स्वयंभू धर्मगुरू आसारामला दशकभर जुन्या लैंगिक अत्याचार प्रकरणात दोषी ठरवले. १० वर्षांपूर्वी सुरतमधील एका महिलेने अहमदाबादच्या मोटेरा येथील आसाराम बापू य़ांने आपल्या आश्रमात वारंवार बलात्कार केल्याचा आरोप केला होता. मात्र, न्यायालयाने पुराव्याअभावी आसारामला त्याच्या पत्नीसह अन्य सहा आरोपींना निर्दोष मुक्त केले होते.
त्यानंतर अहमदाबादमधील चांदखेडा पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या एफआयआरनुसार, आसाराम बापूने 2001 ते 2006 या कालावधीत आपल्या शहराबाहेरील आश्रमात एका महिलेवर अनेक वेळा बलात्कार केल्याचा गुन्हा नोंद झाला.
त्यानंतर नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहिलेले आसाराम जोधपूर येथील एका बलात्कार प्रकरणात तुरुंगात आहे. सूरत-स्थित एका महिलेने आसाराम बापू आणि इतर सात जणांविरुद्ध बलात्कार आणि बेकायदेशीर कैदेत ठेवल्याचा गुन्हा ऑक्टोबर 2013 मध्ये दाखल केला होता. खटला प्रलंबित असताना त्यापैकी एकाचा मृत्यू झाला होता. या आरोपांचे जुलै 2014 मध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.


previous post