गेल्या काही दिवसांपासून राज्यसभेच्या निवडणूकीवरून राज्यात घमासान सुरु असतानाच आता काॅंग्रेसमध्ये दुफळी पडत असल्याचे दिसत आहे. गुजरातचे नेते हार्दिक पटेल यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाबद्दल नाराजी व्यक्त करत पक्षाला रामराम ठोकला. तर आज पक्षांतर्गत उघड नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसवर नाराज असलेले आशिष देशमुख काॅंग्रेस प्रदेश सचिवपदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती समोर आली आहे. देशमुख सचिवपद का सोडणार याची उलट-सुलट चर्चा सुरु झाली आहे. ते पक्ष सोडणार का? नेमकी त्यांची भूमिका काय
असणार याबद्दल त्य़ांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बातचित केली आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्रात कर्तबगार नेते असताना काॅंग्रेसने उत्तर प्रदेशच्या इम्रान प्रतापगडी यांना राज्यसभेचा उमेदवार म्हणून निवडल्यामुळे मी राजीनामा देत आहे. त्यांना महाराष्ट्रात लादण्यात आले आहे. म्हणून मी नाराज आहे. पण मी काॅंग्रेसमध्ये राहणार आहे. आणि जनतेची सेवा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पुढे बालताना ते म्हणाले, सोनिया गांधी यांनी मला उमेदवारी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अस असताना इम्रान प्रतापगडी यांना महाराष्ट्रात का लादले आहे. सोनिया गांधी यांच्यावर कोणचा दबाव होता का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. या दबावाखाली पक्षाची हाणी होत आहे. महाराष्ट्रातील उमेदवार दिला असता तर येणाऱ्या महानगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत काॅंग्रेसला बळकटी देण्यासाठी मदत झाली असती. उत्तर प्रदेशमध्ये फक्त दोन आमदार निवडून आले आहेत. राज्यसभेसाठी तीघेजण जात आहेत. यामुळे माझ्यासह अनेक कार्यकर्ते नाराज आहेत. उत्तर प्रदेशमध्ये जी परिस्थिती आहे तशी परिस्थिती महाराष्ट्रात करायची का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
काॅंग्रेसमध्ये नाराजी: आशिष देशमुख सचिवपद सोडणार; राजीनाम्याचं कारण काय?
Advertisements