मुंबई
बीएसईचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ आशिषकुमार चव्हाण हे आगामी काळामध्ये नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (एनएसई) चे व्यवस्थापक संचालक व सीईओपद सांभाळणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. बाजारातील नियामक सेबीने सदरच्या निवडीला मंजुरी दिली असल्याचेही सूत्रांकडून समजते. चौहान यांची सदरची नियुक्ती ही पाच वर्षाकरिता असणार आहे. चौहान हे विक्रम लिमये यांची जागा घेणार आहेत.