Tarun Bharat

MCA च्या अध्यक्षपदासाठी आशिष शेलार विरूद्ध संदीप पाटील सामना

Advertisements

ऑनलाईन टीम / तरुण भारत :

Ashish Shelar vs Sandeep Patil for MCA President Election मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी यंदा माजी क्रिकेटपटू विरुद्ध राजकीय नेता अशी लढत होणार आहे. भाजपचे नेते आशिष शेलार विरुद्ध माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांच्यात या निवडणुकीचा सामना रंगणार आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक 20 ऑक्टोबरला होणार आहे. या निवडणुकीसाठी 6 ते 10 ऑक्टोबर दरम्यान अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. संदीप पाटील 6 ऑक्टोबरला अर्ज दाखल करणार आहेत. तब्बल 11 वर्षांनंतर पुन्हा एकदा क्रिकेटपटू विरुद्ध राजकीय नेत्यामध्ये एमसीए अध्यक्षपदासाठी लढत होणार आहे. यापूर्वी 2011 मध्ये माजी क्रिकेटर दिलीप वेंगसरकर आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यात अध्यपदासाठी लढत झाली होती. त्यावेळी विलासरावांनी वेंगसरकरांना मात दिली होती.

अधिक वाचा : खडसेंना 3 तास ऑफिसबाहेर बसवून अमित शाह यांनी भेट नाकारली

आता यंदाही राजकीय नेता क्रिकेटपटूवर भारी पडणार की, संदीप पाटील आशिष शेलारांना मात देणार याकडे राजकीय नेत्यांसह क्रीडा विश्वाच लक्ष लागलं आहे. शेलार 2015 मध्ये उपाध्यक्षपदी निवडून आले होते. त्यानंतर 12 जानेवारी 2017 रोजी त्यांची अध्यक्षपदी निवड झाली होती. लोढा शिफारशींच्या सूचनेमुळे शरद पवार यांना संघटनेच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देणे भाग पडले होते, त्यामुळे तेव्हा शेलार यांच्याकडे सूत्रे आली होती.

Related Stories

शिवभक्तीच्या ऊर्जेतून कलायोगींच्या पेटिंगचा ‘रिमेक’

Archana Banage

उदयनराजे व झेडपी अध्यक्ष कबुले यांच्या भेटीची चर्चा

Patil_p

कोल्हापुरातून 1 हजार 66 मजूर श्रमिक एक्सप्रेसने मध्यप्रदेशकडे रवाना

Archana Banage

निकोलस पूरन, रोस्टन चेस विंडीजचे उपकर्णधार

Omkar B

Sport News : जानेवारीत राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचे कोल्हापुरात धुमशान रंगणार

Archana Banage

ऑस्ट्रेलियाची बार्टी मानांकनात आघाडीवर

Patil_p
error: Content is protected !!