Ashok Chavan: आशिष कुलकर्णी यांच्या घरी काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काॅंग्रस नेते अशोक चव्हाण हे गणपतीच्या दर्शनासाठी गेले होते. या भेटीनंतर काॅंग्रेस आणि भाजपमध्ये नेमकं काय सुरु आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. दरम्यान आज अशोक चव्हाण यांच्या कार्यालयाकडून यावर प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस यांच्याबरोबर कोणतीच राजकीय चर्चा झालेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केलं आहे.
आशिष कुलकर्णी यांच्या घरी उभ्या उभ्या भेट झाली आहे. यावेळी कोणतीही भेट अथवा चर्चा झाली नाही. परवा दिल्लीत काॅंग्रेसचा मोर्चा आहे. त्यासाठी उद्या मी दिल्लीला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. मात्र राज्यात गेल्या काही महिन्यापासून घडणाऱ्या घडामोडींमुळे त्यांच्या भेटीवर शंका उपस्थित केली जात आहे.


previous post