चेन्नई
व्यावसायिक वाहन निर्मिती करणारी कंपनी अशोक लेलँडने आपला पहिला आठचाकांचा ट्रक एव्हीटीआर 2620 बाजारात दाखल केला आहे. लिफ्ट ऍक्सल तंत्रज्ञानावर आधारीत ट्रकांची पूर्ण शेणी तयार करण्यात येणार आहे.
कंपनीने म्हटले आहे, की एव्हीटीआर 2620 ला सादर करण्यासोबतच अशोक लेलँड देशातील पहिली व एकमात्र कंपनी बनली आहे. लिफ्ट ऍक्सल तंत्रज्ञानावर आधारीत 25.5 ते 47.5 टन वजनाचे विविध गटातील ट्रक सादर केले आहेत.
ग्राहकांना सेवा देण्यासाठी सज्ज
कंपनीचे व्यावसायिक वाहन प्रमुख संजीव कुमार यांनी म्हटले आहे, की ‘एव्हीटीआर 2620 ही नवी ट्रक सादर करताना अत्यानंद होत आहे. आपल्या ग्राहकांना आगामी काळात सर्वात चांगली लॉजिस्टिक सेवा देण्यासाठी सज्ज असणार आहे.