वृत्तसंस्था/ बीजिंग
चीनमध्ये सध्या पुन्हा कोरोनाच्या नव्या लाटेने थैमान घातले आहे. दरम्यान चीनमधील हांगझोयु येथे 9 ते 15 ऑक्टोबर दरम्यान होणारी आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा कोरोना समस्येमुळे लांबणीवर टाकण्याचा निर्णय मंगळवारी स्पर्धा आयोजकांनी अधिकृतपणे जाहीर केला.
2022 च्या आशियाई पॅरा क्रीडास्पर्धा आयोजन समिती आणि आशिया पॅरा ऑलिंपिक समिती यांनी ही स्पर्धा कोरोना समस्येमुळे लांबणीवर टाकण्याची संयुक्त घोषणा केली आहे. त्याचप्रमाणे 10 ते 25 सप्टेंबर दरम्यान होणारी हांगझोयु आशियाई क्रीडास्पर्धा बेमुदत लांबणीवर टाकण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. चीनमध्ये कोरोनाबाधित रूग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत असल्याने स्पर्धा आयोजकांना हा निर्णय घ्यावा लागत आहे.
आरसीबी हॉल ऑफ फेममध्ये
गेल, डीव्हिलीयर्सचा समावेश